हैदराबाद Durga Devi Vahan 2024 : पितृ पंधरवडा संपल्यानंतर नवरात्रीला सुरूवात होते. 'शारदीय नवरात्र' (Shardiya Navratri 2024) उत्सव दुर्गा देवीला समर्पित आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवी शक्तीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. यावेळी गुरुवार, 3 ऑक्टोबर 2024 पासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होत असून 12 ऑक्टोबरला सांगता होणार आहे.
मातेचे वाहन कसे ठरते : कोणत्या वाहनाने देवी येणार आहे, हे दिवस आणि वेळेनुसार ठरविले जाते. देवी भागवत ग्रंथातील श्लोकांमध्ये या सर्वांचे तपशीलवार वर्णन केले आहे. जर सोमवारी किंवा रविवारी घटस्थापना असेल तर माता दुर्गा हत्तीवर स्वार होऊन येते. नवरात्रीच्या प्रारंभ हा शनिवार किंवा मंगळवार असेल तर देवीचं वाहन घोडा असतो. गुरुवार किंवा शुक्रवारी नवरात्री सुरू झाली तर देवी पालखीत बसून येते.
कोणत्या वाहनाने देवी येणार : यावर्षी एप्रिल महिन्यात येणाऱ्या चैत्र नवरात्रीच्या काळात देवी घोड्यावर स्वार होऊन आली होती. तर शारदीय नवरात्रीमध्ये देवी पालखीत किंवा डोलीत स्वार होऊन येत आहे. देवी कोणत्या वाहनात येते, यानुसार याचा परिणाम जनमानसावरही होतो. यावेळी गुरुवारपासून नवरात्रीला सुरूवात होत असल्यानं देवीची स्वारी पालखी आहे.
दुर्गा देवीच्या वाहनाचा काय परिणाम : जेव्हा दुर्गा देवी हत्तीवर येते तेव्हा जास्त पाऊस पडतो. ज्यामुळं शेतात चांगले पीक येते. दुर्गा देवी घोड्यावर आल्यावर युद्धसदृश परिस्थिती निर्माण होते. दुर्गा देवी जेव्हा बोटीवर येते तेव्हा ते शुभ असते आणि त्याचा चांगला परिणाम होतो. जेव्हा दुर्गा देवी डोलीवर किंवा पालखीवर येते तेव्हा महामारीची भीती असते.
टीप - सदरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे. या लेखातील माहितीशी 'ईटीव्ही भारत' सहमत असेलच असं नाही.
हेही वाचा -