शर्मिला ठाकरे यांनी घेतली जखमी पोलिसांची भेट; अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरचं केलं सर्मथन - Akshay Shinde Encounter
🎬 Watch Now: Feature Video
Published : Sep 25, 2024, 10:56 PM IST
ठाणे : बदलापूर येथील एका शाळेत लहान मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या अक्षय शिंदेचा 23 सप्टेंबरला एन्काऊंटर मध्ये मृत्यू झाला. या एन्काऊंटरवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप होत असतानाच मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी एन्काऊंटरमध्ये जखमी झालेल्या तीन पोलिसांची भेट घेतली. त्यांनी पोलिसांचं अभिनंदन करत, एन्काऊंटर योग्यच असल्याचं म्हटलं. सध्या सर्व वयोगटातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून समाजात कोणतीच महिला सुरक्षित नसल्याचं त्यांनी सांगितलं. महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना अशा प्रकारे शिक्षा झाली तरच त्यांच्यावर वचक बसेल आणि भविष्यात अशा घटना कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दोन मुलींवर झालेल्या अत्याचारानंतर बदलापूरसह संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. नागरिकांनी या घटनेविरोधात आपला राग व्यक्त करत सरकारला लवकरात लवकर न्याय देण्याची मागणी केली होती. असं कृत्य करणाऱ्या नराधमांना अशाच प्रकारे शिक्षा मिळायला हवी, असं शर्मिला ठाकरे यांनी सांगितलं.