शांताबाईसाठी धनंजय मुंडे गाडीतून उतरले खाली अन् काय झालं पुढे? पाहा संपूर्ण व्हिडिओ - DHANANJAY MUNDE
🎬 Watch Now: Feature Video
Published : Jan 19, 2025, 7:55 PM IST
शिर्डी : राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी आज शिर्डीत येवून साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं. साई दर्शनानंतर मुंडे यांचा शॉल, साई मूर्ती, देवून संस्थानच्या वतीनं सत्कार करण्यात आला. दर्शनानंतर धनंजय मुंडे पुढील दौऱ्यासाठी रवाना होताना, अचानक एक 70 वर्षीय आजीबाई त्यांच्या गाडीजवळ आली. ते पाहून धनंजय मुंडे यांनी गाडीतून उतरून त्या आजीचा हातात हात घेत विचारपूस केली आणि आजीच्या पाया पडून दर्शन घेतलं. यावेळी आजी म्हणाल्या, "धनुभाऊ कसा आहेस तू जेवण केलं का?, तबेतची काळजी घे" यावर मुंडेनी आजी कुठून आलाय तुम्ही? असं विचारलं. त्यावेळी आजीनं सांगितलं की, "मी बीड जिल्ह्यातील कोठारबन येथील आहे, आपण भाऊबंद आहे. माझं नाव शांताबाई मुंडे आहे". असं सांगितल्यानंतर धनंजय मुंडेंना ही आनंद झाला त्यांनी आजीबरोबर फोटो काढला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थां निवडणुकीचा पार्श्वभूमीवर शिर्डीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं दोन दिवसीय नवसंकल्प शिबीर पार पडतंय. या शिबिराला मंत्री धनंजय मुंडे यांनी उपस्थिती लावली होती.