नवी दिल्ली Team India T20I Squad Announced : बांगलादेशविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (BCCI) 28 सप्टेंबर (शनिवार) रोजी संघाची घोषणा केली. 15 सदस्यीय भारतीय संघाचं नेतृत्व सूर्यकुमार यादव करणार आहे. 6 ऑक्टोबरपासून टी-20 मालिका खेळवली जाणार आहे.
NEWS 🚨 - #TeamIndia’s squad for T20I series against Bangladesh announced.
— BCCI (@BCCI) September 28, 2024
More details here - https://t.co/7OJdTgkU5q #INDvBAN @IDFCFIRSTBank pic.twitter.com/DOyz5XGMs5
युवा खेळाडूंना संधी : वेगवान गोलंदाज मयंक यादवला प्रथमच भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. संजू सॅमसन आणि जितेश शर्मा यांची यष्टिरक्षक म्हणून निवड करण्यात आलीय. रियान पराग, शिवम दुबे, रवि बिष्णोई आणि हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती या युवा खेळाडूंनाही संघात स्थान मिळालं आहे. ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर आणि ईशान किशन या तिघांना संधी मिळालेली नाही. तर ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिल यांना या टी-20 मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे.
India announce their squad for T20Is against Bangladesh 🇮🇳 pic.twitter.com/6dcI9XumKb
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) September 28, 2024
भारत-बांगलादेश टी-20 मालिकेचं वेळापत्रक
- पहिला टी-20 सामना - ग्वाल्हेर, 6 ऑक्टोबर
- दुसरा टी-20 सामना - दिल्ली, 9 ऑक्टोबर
- तिसरा टी-20 सामना - हैदराबाद, 12 ऑक्टोबर
(सर्व सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरू होतील.)
टी-20 सामन्यांसाठी भारताचा संघ : बांगलादेश विरूद्धच्या टी 20I मालिकेसाठी टीम इंडिया : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टिरक्षक), रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, रियान पराग, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, जितेश शर्मा (यष्टिरक्षक), अर्शदीप सिंग, हर्षित राणा आणि मयंक यादव.
हेही वाचा
- IPL 2025 च्या मेगा लिलावापूर्वी BCCI खेळाडूंवर मेहरबान; जय शाहांच्या 'या' घोषणेनं क्रिकेटर्स मालामाल - IPL 2025
- T20 विश्वचषकानंतर नेपाळ कॅनडाविरुद्ध खेळणार पहिलाच सामना; 'इथं' पाहू शकता लाईव्ह मॅच - CAN VS NEP 1st T20I LIVE IN INDIA
- कानपूर कसोटी पावसामुळं वाहून गेल्यास WTC च्या पॉइंट टेबलमध्ये भारताचं किती नुकसान होणार? - WTC Point Table Update