कटक Team India Record At Cuttack : भारत आणि इंग्लंड क्रिकेट संघ यांच्यात खेळल्या जाणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियानं 4 विकेट्सनं विजय मिळवत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेतील दुसरा सामना दोन्ही संघांमध्ये 9 फेब्रुवारी रोजी कटकमधील बाराबती स्टेडियमवर खेळला जाईल. कटकच्या या मैदानावर टीम इंडिया जवळजवळ 6 वर्षांनी वनडे सामना खेळणार आहे. अशा परिस्थितीत, सर्वांचं लक्ष भारतीय संघाच्या आतापर्यंतच्या विक्रमावर असेल.
For his impressive 8⃣7⃣-run knock in the chase, vice-captain Shubman Gill bags the Player of the Match award! 👍 👍
— BCCI (@BCCI) February 6, 2025
Scorecard ▶️ https://t.co/lWBc7oPRcd#TeamIndia | #INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/7ERlZcopxR
कटकच्या मैदानावर टीम इंडियानं खेळले 19 सामने : जर आपण कटकच्या बाराबती स्टेडियमबद्दल बोललो तर आतापर्यंत इथं 21 वनडे सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी 19 सामने भारतीय संघानं खेळले आहेत. इथं खेळल्या गेलेल्या 21 वनडे सामन्यांपैकी 2 सामने रद्द झाले तर लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघानं 12 सामने जिंकले तर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला फक्त 7 सामने जिंकता आले. या मैदानावर खेळल्या गेलेल्या 19 पैकी 13 सामन्यांमध्ये टीम इंडियानं विजय मिळवला आहे, तर चार सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर 2 सामने रद्द करण्यात आले आहेत. या खेळपट्टीवर पहिल्या डावात सरासरी 225 ते 230 धावा झाल्या आहेत.
A solid win in the bag for #TeamIndia! 💪 💪
— BCCI (@BCCI) February 6, 2025
They beat England by 4⃣ wickets in Nagpur & take 1-0 lead in the ODI series! 👏 👏
Scorecard ▶️ https://t.co/lWBc7oPRcd#INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/lJkHoih56n
इंग्लंडविरुद्ध खेळले 10 वनडे सामने : भारतीय संघानं कटकच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध आतापर्यंत 10 वनडे सामने खेळले आहेत, त्यापैकी 6 सामने जिंकण्यात यश आलं आहे तर 4 मध्ये पराभव पत्करावा लागला आहे. या मैदानावर दोन्ही संघांमध्ये शेवटचा वनडे सामना 2017 मध्ये खेळला गेला होता, जो टीम इंडियानं 15 धावांनी जिंकला होता. या मैदानावर सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही टीम इंडियाच्या नावावर आहे, जो त्यांनी 2017 मध्ये इंग्लंड संघाविरुद्ध केला होता, ज्यात भारतीय संघानं 50 षटकांत 381 धावा केल्या होत्या.
हेही वाचा :