हैदराबाद Google Pixel 9A, मालिकेची बहुप्रतिक्षित परवडणारी आवृत्ती, लवकरच जागतिक बाजारपेठेत दाखल होणार आहे. या स्मार्टफोनमध्ये सुधारित कॅमेरा आणि डिझाइनसह अनेक अपग्रेड्स फीचर मिळण्याची अपेक्षा आहे. या फोनची संभाव्य लाँचिंग तारीख, विक्री, स्पेसिफिकेशन आणि अपेक्षित किंमत लीक झाली आहे. मात्र, गुगलनं लॉंचच्या तारखेबाबत कोणतीही माहिती दिलेली नाहीय.
Google Pixel 9A लाँचिंग तारीख (अपेक्षित)
Google Pixel 9A 19 मार्च रोजी जागतिक बाजारपेठेत लाँच होईल असं वृत्त आहे. हा फोन 26 मार्च रोजी विक्रीसाठी उबलब्ध होण्याची अपेक्षा आहे. मात्र, अमेरिका आणि युरोपीय बाजारपेठेत लीक झालेल्या लाँचिंग आणि विक्री तारखा आहेत. भारतात लाँचची अधिकृत पुष्टी नसली तरी, मात्र, हा फोन 19 मार्चलाच लॉंच होण्याची शक्यता आहे, असं एका अहवालात म्हटलं आहे.
Google Pixel 9A ची किंमत (अपेक्षित)
अमेरिकेत गुगल पिक्सेल 9A ची किंमत 499$ (अंदाजे 43,319 ) रुपये असण्याची अपेक्षा आहे. 256 जीबी व्हेरिएंटची किंमत 599$ (अंदाजे रु. ५2,14.16) असण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, पिक्सेल 8A भारतात 52,999 रुपयांना लाँच करण्यात आला होता पिक्सेल 9A ची लाँच किंमतही तितकीच असण्याची अपेक्षा आहे.
काय असतील फीचर
गुगल पिक्सेल 9A 120 हर्ट्झ रिफ्रेश रेटसह 6.3-इंच ओएलईडी पॅनेलसह येण्याची अपेक्षा आहे. हा स्मार्टफोन HDR10+ ला सपोर्ट करू शकतो. त्याचा कमाल ब्राइटनेस 2,700 nits असू शकतो. हा फोन कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 नं प्रोटेक्टेड असू शकतो. या स्मार्टफोनमध्ये गुगल टेन्सर G4 चिपसेट असू शकतो आणि 8GB रॅम आणि 256GB पर्यंत UFS 3.1 स्टोरेज असू शकते. यात 5100 mAh बॅटरी असू शकते आणि 23W वायर्ड आणि 7.5W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करेल.
हे वाचलंत का :