ETV Bharat / state

आंतरजातीय लग्न मान्य नसल्याने सासर्‍याने जावयाचं केलं अपहरण; नंतर झालं असं काही... - INTERCAST MARRIAGE AGAINST KIDNAP

कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि करवीर पोलिसांनी संयुक्त तपास करीत मंगळवारी अपहरण झालेला तरुण विशाल मोहन अडसूळ याची सहीसलामत सुटका केलीय.

Father-in-law kidnaps son-in-law
सासर्‍याने जावयाचं केलं अपहरण (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 12, 2025, 1:04 PM IST

कोल्हापूर- सोशल मीडियाच्या माध्यमातून झालेल्या ओळखीतून मुलीने मुलासोबत आंतरजातीय विवाह केला. मात्र याच रागातून संतापलेल्या वडिलांनी जावयाचंच अपहरण करून त्याला बेदम मारहाण करत ठार मारण्याचा प्रयत्न केलाय. ही सर्व धक्कादायक घटना कोल्हापुरातील करवीर तालुक्यातील भुयेवाडी येथे उघडकीस आलीय. या प्रकरणी कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि करवीर पोलिसांनी संयुक्त तपास करीत मंगळवारी अपहरण झालेला तरुण विशाल मोहन अडसूळ (वय 26, रा. भुये, ता. करवीर) याची सहीसलामत सुटका केलीय, याप्रकरणी सासऱ्यासह तिघांना कोल्हापूर पोलिसांनी अटक केली असून, यातील चार संशयितांचा शोध सुरू आहे.

दोघांच्या लग्नाला घरच्यांचा विरोध : मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापुरातील करवीर तालुक्यातील भुयेवाडी येथे राहणारा विशाल मोहन अडसूळ आणि मिरज येथे राहणारी श्रुती कोकरे यांची वर्षभरापूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली होती. त्यानंतर ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. मात्र दोघांच्या लग्नाला घरच्यांचा विरोध झाल्याने सात महिन्यांपूर्वी त्यांनी पळून जाऊन लग्न केलं. याचा राग मुलीचे वडील श्रीकृष्ण महादेव कोकरे (वय 45, रा. वाघमोडेनगर, कुपवाड, ता. मिरज) यांना होता आणि याच रागातून कोकरे यांनी जावयाचं अपहरण करायचं ठरवलं आणि कोकरे यांनी मित्रांना पैसे देऊन पाळत ठेवण्यास सांगितलं. त्यानुसार संशयितांनी आठवडाभर त्याच्यावर पाळत ठेवून माहिती काढली आणि रविवारी रात्री सव्वानऊच्या सुमारास भुयेवाडी कमानीजवळ कारमध्ये घालून त्याचे अपहरण केले. त्याचे हातपाय बांधून मारहाणही केली. अपहरण होताच रविवारी रात्री विशालच्या वडिलांनी भुयेवाडीतून अपहरण केल्याची फिर्याद करवीर पोलीस ठाण्यात दाखल केली.

रागाच्या भरातून जीवे मारण्याच्या उद्देशानेच अपहरण : पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि मिरजेतील बेदाणा व्यापारी श्रीकृष्ण कोकरे याने साथीदारांच्या मदतीने अपहरण केल्याची माहिती कॉन्स्टेबल रामचंद्र कोळी यांना मिळाली, त्यानुसार पथकाने मिरजेतून कोकरे याला ताब्यात घेतले. तसेच धीरज ऊर्फ हणमंत नामदेव पाटील (56, राकवठेपिरान, ता. मिरज) आणि राजेंद्र परमेश्वर कट्टीमणी (33, रा. कुपवाड एमआयडीसी, सांगली) यांनाही पोलिसांनी अटक केली आणि अधिक चौकशी केले असता रागाच्या भरातून जीवे मारण्याच्या उद्देशानेच अपहरण केलं होतं, शिवाय दीड महिन्यापूर्वी एकदा त्यांनी अपहरणाचा प्रयत्न केल्याची कबुली अटकेतील संशयितांनी दिलीय. दरम्यान पोलिसांनी विशालची सुखरूप सुटका केलीय.

हेही वाचा-

  1. "...तर आम्ही पुढील लोकसभा लढवायची कशी?", दिल्ली निवडणूक निकालावरुन संजय राऊतांचा सवाल
  2. "शिवसेनाप्रमुख नाहीत या आनंदात भाजपाने निवडणुका लढवल्या",' संजय राऊत म्हणतात, "शिंदेंचं ऑपरेशन अमित शाह..."

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.