मुंबई - 2025ची जगातील टॉप 10 सर्वात देखण्या पुरुषांची यादी प्रसारित झाली आहे. के-पॉप सेन्सेशन किम तायह्युंग, ज्याला बीटीएसमधील व्ही म्हणून ओळखलं जातं, त्याला हॉलिवूड आणि बॉलिवूडच्या दिग्गजांना मागे टाकून जगातील सर्वात देखणा पुरुष म्हणून निवडण्यात आलंय. टेकनो स्पोर्ट्सनं संकलित केलेल्या क्रमवारीनुसार जगभरातील चाहते व्ही जगातील आकर्षण पुरुष झाल्याबद्दल खूप खुश आहेत. किम तायह्युंगला जगातील सर्वात देखणा पुरूष म्हणून गौरवण्यात आल्यानंतर त्याचे फॉलोअर्स देखील अधिक वाढले आहेत. व्ही हा त्याच्या सुंदर गायन आणि आकर्षक हावभावामुळे खूप प्रसिद्ध आहे. याशिवाय त्याचा डान्स देखील अनेकांना आवडतो.
जगातील देखण्या पुरुषांच्या यादी बीटीएसमधील व्ही : टेकनो स्पोर्ट्सनं संकलित केलेल्या क्रमवारीत व्ही हा अव्वल स्थानावर आहे. सध्या व्ही दक्षिण कोरियामध्ये सैन्यात सेवा बजावत आहे. व्ही व्यतिरिक्त, आरएम, जिमिन, जंगकूक आणि सुगा देखील सैन्यासाठी अनिवार्य पदावर कार्यरत आहेत. व्ही आपल्या हावभावामुळे त्याच्या चाहत्यांना आकर्षित करत असतो. तसेच व्ही हा जून महिन्यामध्ये सैन्यातून परतणार आहेत. याशिवाय जिन, जे-होप यांनी आपली मिलिट्री सर्विस पूर्ण केली आहे.
देखण्या पुरुषांच्या यादीत हृतिक रोशनचं नाव : दरम्यान या यादीमध्ये एका भारतीय कलाकारचं देखील नाव आहे. हा अभिनेता हृतिक रोशन आहे. हृतिकनं या यादीत 9 स्थान पटकवलं आहे. दरम्यान कामाच्या बाबतीत, व्हीचे शेवटचे एकल, 'विंटर अहेड' नोव्हेंबर 2024 मध्ये रिलीज झाले होते. आता बीटीएसमधील सर्व सदस्य आपली सैन्याची नोकरी झाल्यानंतर के-पॉप बँडमध्ये पुन्हा एकत्र येऊ शकतात. व्ही व्यतिरिक्त, या यादीमध्ये ब्रैड पिट, रॉबर्ट पैटिंसन, नोआ मिल्स, हृतिक रोशन, क्रिस इवांस आणि टॉम क्रूझ यांचाही समावेश आहे. या यादीत हृतिक रोशनचं नाव असल्यामुळे त्याचे देखील चाहते खुश आहेत.
2025 पर्यंत जगातील टॉप 10 सर्वात देखण्या पुरुषांची संपूर्ण यादी
1 बीटीएसचा व्ही (किम तायह्युंग)
2 ब्रैड पिट
3 रॉबर्ट पैटिंसन
4 क्रिस इवांस
5 हेनरी कैविल
6 टॉम क्रूज
7 ब्रैडली कूपर
8 नोआ मिल्स
9 हृतिक रोशन
10 जस्टिन ट्रूडो