हैदराबाद : किशोरावस्था ही अशी अवस्था आहे जेव्हा, मुलं स्वतःसाठी निर्णय घेण्यासाठी सक्षम नसतात. अशा परिस्थितीत, पालकांना मुलांवर लक्ष ठेवणं अवघड होऊन बसतं. तंत्रज्ञानाच्या जगात, मुलगा सोशल मीडियावर कोणाशी बोलतोय?, त्याचं सोशल मीडिया अकाउंट किती वेळ सक्रीय असतं? आदी बाबत पालकांना काळजीत वाटते. यातून पालकांना दिलासा देण्यासाठी, मेटानं भारतातील किशोरांसाठी इंस्टाग्राम टीन अकाउंट सुरू केलं आहे.
इंस्टाग्राम टीन अकाउंट हे किशोरवयीन मुलांचं वैयक्तिक अकाउंट असलं, तरी पालक त्यांच्यावर लक्ष ठेवू शकतील. मेटाच्या मते, पालक त्यांच्या किशोरवयीन मुलांसाठी स्क्रीन टाइम देखील सेट करू शकतात. या खात्याची खास गोष्ट म्हणजे, ते रात्री 10 ते सकाळी 7 वाजेपर्यंत कोणतीही सूचना पाठवत नाही.
इंस्टाग्राम टीन अकाउंटची वैशिष्ट्ये
कंपनीनं अनेक सुरक्षा वैशिष्ट्यांसह हे टीन आकांऊट तयार केलंय. हे अकांऊट 18 वर्षांखालील किशोरवयीन मुलांसाठी असेल.
- खाजगी खाते : इंस्टाग्राम टीन अकाउंट डीफॉल्टनुसार खाजगी असेल. फक्त आपण मान्य केलेले फॉलोअर्स आपल्या पोस्ट पाहू शकतात किंवा त्यांच्याशी संवाद साधू शकतील.
- मेसेजिंगमध्येही सुरक्षितता : किशोरवयीन वापरकर्ते फक्त अशा लोकांकडूनच मेसेज मिळवू शकतात, ज्यांना ते स्वतः फॉलो करतात.
- संवेदनशील कंटेंट नियंत्रण: हे वैशिष्ट्य देखील डीफॉल्ट आहे. किशोरवयीन मुलांसाठी अनुचित सामग्री पोस्ट करू नये, म्हणून एक सामग्री फिल्टर ठेवण्यात आलं आहे.
- टॅग करता येत नाही : किशोरवयीन मुलांचं अकाउंट कोणत्याही अज्ञात वापरकर्त्याद्वारे टॅग केलं जाऊ शकत नाहीत, किंवा ते त्यांच्या पोस्टमध्ये त्यांचा उल्लेख करू शकत नाहीत. मेटाचं हे वैशिष्ट्य आक्षेपार्ह भाषा देखील फिल्टर करते.
- मर्यादित वेळेचं रिमाइंडर्स : जर किशोरवयीन मुलानं 60 मिनिटे म्हणजे एक तासासाठी सतत ॲप वापरला तर त्याला अलर्ट मिळण्यास सुरुवात होईल.
- स्लीप मोड : या ॲपमध्ये स्लीप मोड फीचर देखील आहे. मुलांना रात्री 10 ते सकाळी 7 वाजेपर्यंत कोणतीही सूचना मिळणार नाही.
पालक कसं लक्ष ठेवणार?
पालकांना त्यांच्या मुलांनी गेल्या सात दिवसांत मेसेज केलेल्या लोकांची यादी पाहता येईल. तथापि, एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, की पालक फक्त त्यांचे मूल कोणाला संदेश पाठवत आहे ते पाहू शकतात, परंतु ते संदेश वाचू शकत नाहीत. यासोबतच, पालक त्यांच्या किशोरवयीन मुलांसाठी वेळ निश्चित करू शकतात. एकदा निर्धारित वेळ मर्यादा ओलांडली की, पाल्य इंस्टाग्रामवर प्रवेश करू शकत नाही.
हे वाचलंत का :