Kiss Day 2025: जगभरात व्हॅलेंटाईन दिवस साजरा होत आहे. आठवडाभरच चालणाऱ्या या व्हॅलेंटाईन सप्ताहातील प्रत्येक दिवसाला विशेष महत्व आहे. रोज डे पासून चालू होणारा हा वीक व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी संपतो. या वीकमधील सातवा दिवस म्हणजे किस डे. 13 फेब्रुवारी रोजी हा दिवस साजरा केला जाणार आहे. प्रेमी युगुलांसाठी हा दिवस खास असतो. या दिवशी एकमेकांना चुंबन घेतल्यास प्रेमाचं नातं मजबूत होतं असं म्हटलं जातं. चुंबन घेणे हा भावना व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे. चुंबन घेणे केवळ शारीरिकदृष्ट्या निरोगी ठेवत नाही तर मानसिक आरोग्यासाठी देखील चांगलं आहे. चुंबन घेतल्यानं मेंदूतील ऑक्सिटोसिन, डोपामाइन आणि सेरोटोनिन सारखी रसायनं बाहेर पडतात. परंतु भावना व्यक्त करण्याच्या या चुंबनाचे फायद्यासोबतच अनेक तोटे देखील आहेत हे तुम्हाला माहिती आहे काय? चला तर पाहूया चुंबन घेण्याचे फायदे आणि तोटे.
एका चुंबनामुळे 8 कोटी बॅक्टेरीयांची देवाणघेवाण होते. यातील काही बॅक्टेरीया शरीरासाठी चांगले आहेत तर काही हानिकारक. हानिकारक बॅक्टेरीयामुळे आरोग्यविषयक अनेक समस्या उत्भवतात.
चुंबन घेण्याचे फायदे:
- रोगप्रतिकर शक्ती वाढते: एका अभ्यासात असं आढळून आलं की, चुंबन घेतल्यानं रोगप्रतिकर शक्ती वाढते. कारण आपण जेव्हा जोडीदाराचं चुंबन घेतो तेव्हा तोंडात लाळ तयार होते. ही लाळ दातांवरील प्लाक साफ करते. तसंच दातांना चिकटलेले पोकळी निर्माण करणारे कण काढून टाकण्यास मदत करते. त्याचबरोबर जोडीदारांची लाळ मिक्स झाल्यामुळे चागंल्या बॅक्टेरीयाची देवाणघेवाण होते. परिणामी रोगप्रतिकार शक्ती वाढते.
- चुंबन तुम्हाला आनंदी ठेवण्यास मदत करते: जेव्हा तुम्ही चुंबन घेता तेव्हा मेंदू ऑक्सिटोसिन, डोपामाइन आणि सेरोटोनिन सारखी रसायने सोडतो. हे तुम्हाला मनासारख काम करण्यास मदत करतात. तसंच कोर्टिसोलची पातळी (तणाव संप्रेरक) कमी करते. आनंदी ठेवणारे हे संप्रेरक मूड स्विंग नियंत्रित करण्यास मदत करतात.
- कॅलरीज बर्न: दोन ते तीन मिनिटं किस केल्यानं कॅलरीज बर्न होतात. तसंच किस केल्यामुळे चयापय सुरळीत होतो. परिणामी वजन कमी होतो तसंच हृदयाची गती वाढल्यानं शरीरातील ऑक्सिजनचा प्रवाह वाढतो आणि कॅलरी बर्न होण्याचा दर देखील वाढतो.
- ताण आणि चिंता नियंत्रित करते: चुंबनामुळे कोर्टिसोलची पातळी कमी होण्यास मदत होते. यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि तणावाची पातळी कमी होते.
- रक्तदाब आणि कोलेस्टेरॉलची पातळी कमी करते: उच्च रक्तदाब असलेल्यासाठी किस घेणे फायदेशीर ठरू शकते. कारण चुंबन घेताना हृदयाची गती वाढते आणि त्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत होते. परिणामी रक्तदाब कमी होण्यास मदत होते.
- किस करण्याचे दुष्परिणाम
- सायटोमेगॅलव्हायरस: सायटोमेगॅलव्हायरस किंवा सीएमव्ही हा एक सामान्य विषाणू आहे. ज्यांची रोगप्रतिकार शक्ती कमी आहे अशा लोकांवर त्याचे गंभीर परिणाम होवू शकतात. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसीनच्या अभ्यासानुसार एकदा का या विषाणूनं शरीरात प्रवेश केलं तर आयुष्यभर त्यांच्या शरीरात राहतो. हा संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या रक्त, लाळ, मूत्र किंवा शरीरातील इतर द्रवपदार्थांद्वारे पसरतो.
- नागीण: हा एक संसर्गजन्य आजार आहे. जो नागीण सिम्प्लेक्स नावाच्या विषाणूमुळे होतो. जे बाह्य जननेंद्रियाच्या त्वचेवर आणि शरीराच्या इतर भागांवर परिणाम करते. नागीण संसर्गामुळे गुप्तांगांवर आणि शरीराच्या इतर भागांवर खाज सुटणे, वेदनादायक फोड येणे, पुरळ येणे किंवा फोड येणे असे प्रकार होतात. चुंबन, टूथब्रश, भांडी किंवा लैंगिक संभोग यासारख्या सामान्य वस्तु सामायिक केल्याने हा संसर्ग पसरतो. एनआयएचच्या मते, नागीण संसर्ग असलेल्या बहुतेक लोकांना याची माहिती नसते. हर्पस सिम्प्लेक्स विषाणूचे दोन प्रकार आहेत. एक HSV-1 आणि दुसरा HSV-2. एचएसव्ही-1 बहुतेकदा बालपणात होतो. संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यास तुम्हाला ते होऊ शकते. चेहऱ्यावर किंवा डोळ्यांवर नागीण होण्याचे मुख्य कारण HSV-1 आहे. जरी HSV-2 तोंड किंवा डोळ्यांना संक्रमित करण्याची शक्यता असली तरी, सामान्यतः तो गुप्तांगांवर आढळतो.
- सिफिलीस: सिफिलीस हा एक प्रकारचा जिवाणू संसर्ग आहे. जो ट्रेपोनेमा पॅलिडम या जीवाणूमुळे होतो. हा संसर्ग चुंबन किंवा लैंगिक संपर्काद्वारे पसरतो. या आजारामुळे त्वचेवर वेदनारहित फोड येतात. जे गुप्तांग, गुदद्वारात आणि अगदी ओठ आणि तोंडातही होऊ शकते. जर हा आजार वेळेवर समजला तर त्यावर उपचार करणं सोपं आहे. परंतु, उपचार न केल्यास, सिफिलीस मेंदू, मज्जासंस्था आणि हृदयासह इतर अवयवांवर परिणाम करू शकतो. एनआयएचच्या मते , चुंबन घेतल्याने सिफिलीस देखील पसरू शकतो. सिफिलीस असलेल्या व्यक्तीसोबत चुंबन घेतल्याने तोंडाचा संसर्ग होऊ शकतो. म्हणून, संसर्ग टाळण्यासाठी सिफिलीसच्या रुग्णासोबत चुंबन घेणं देखील टाळलं पाहिजे.
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)
संदर्भ
https://newsinhealth.nih.gov/2018/06/herpes-can-happen-anyone