शिर्डी ( अहमदनगर ) - बहुचर्चित 'छावा' सिनेमाच्या प्रदर्शनापूर्वी विकी कौशल आणि रश्मिका मंदान्ना शिर्डीला साईमंदिरात पोहोचले होते. साईंच्या मध्यान्ह आरतीनंतर दोघांनी साई समाधीचं मनोभावे दर्शन घेतलं. 'छावा' चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यावेळी आपल्या टीमसह साईदर्शनासाठी आले होते. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी देशभर विविध राज्यात फिरत असलेली ही टीम रिलीजपूर्वी साई दरबारात दाखल झाली.
अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित 'छावा' सिनेमाची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिलेली आहे. हा सिनेमा येत्या 14 फेब्रुवारीला रिलीज होतोय. विकी कौशलनं या सिनेमात मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारलीय तर रश्मिका मंदाना सिनेमात महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत आहे. दरम्यान, चित्रपटाच्या प्रमोशनसाठी छावाच्या संपूर्ण टीमनं कंबर कसल्याच दिसून येत असून वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन विकी कौशल आणि रश्मिका मंदान्ना प्रेक्षकांशी संवाद साधत आहेत आणि देव दर्शन करताना दिसून येत आहेत.
रश्मिकाच्या पायाला दुखापत झाली असतांनाही ती आणि विकी कौशल शिर्डी साई मंदिरात पोहचले. या वेळी पूर्ण रस्त्यात विकीनं रश्मीचा हात पकडत तिला आधार देताना दिसला. अलिकडेच विकी कौशलनं घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं होतं. त्यानंतर पंजाबमधील अमृतसर येथील सुवर्णमंदिरात तो पोहोचला होता. त्यानंतर आज या विकी आणि रश्मिकाता या जोडीनं शिर्डीत येवून साई दर्शन घेतलंय.
यावेळी बोलताना विकी कौशल यानं प्रथम शिर्डीला आल्याच सांगत जीवनात काही ही सुरवात करताना देवाचं आशीर्वाद महत्त्वाचं असल्याच सांगितलं. तर रश्मीकानं साई दर्शनासाठी पहिल्यांदाच शिर्डीत आल्याचं सांगितलं. उपस्थित पत्रकारांनी तिला शिर्डीत येऊन कसं वाटतंय, असं मराठीत विचारलं असता छावामध्ये मराठा साम्राज्याची राणी येसूबाईची भूमिका साकारणाऱ्या रश्मिका मंदान्नानं 'खूप छान वाटतंय', असं हसून उत्तर दिलं. तिला मराठी बोलण्यासाठी विकी कौशल मदत करताना दिसला.
'छावा' चित्रपटाबद्दलची प्रेक्षकांची उत्सुकता खूपच ताणली असून याच्या रिलीजला केवळ दोन दिवस बाकी आहेत. यावर्षीच्या सुरुवातीला रिलीज होणारा हा सर्वात मोठा हिंदी भाषेतील चित्रपट ठरु शकतो. ऐतिहासिक चित्रपट असल्यामुळे कोणताही वाद निर्माण होऊ शकणार नाही याची काळजी निर्माता व दिग्दर्शकांनी घेतली आहे. यासाठी त्यांनी ऐतिहासिक तथ्यांचा योग्य आधार घेतल्याचं सांगितलं जातंय.
हेही वाचा -