ETV Bharat / state

पंतप्रधान मोदींच्या विमानावर दहशतवादी हल्ल्याचा दावा, मुंबई पोलिसांना मिळाली धमकी - PM NARENDRA MODI PLANE

एका अज्ञात व्यक्तीने मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन केला आणि पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यादरम्यान त्यांच्या विमानावर दहशतवादी हल्ला होणार असल्याचा दावा केलाय, असे अधिकाऱ्याने सांगितले.

Terrorist attack claim on PM Narendra Modi plane
पंतप्रधान मोदींच्या विमानावर दहशतवादी हल्ल्याचा दावा (Source- ETV Bharat)
author img

By PTI

Published : Feb 12, 2025, 3:30 PM IST

मुंबई- महाराष्ट्रातील मुंबईतील पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला एक धमकीचा फोन आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर दहशतवादी हल्ला होणार असल्याची धमकी फोनद्वारे देण्यात आलीय. कॉल आल्यानंतर लगेचच पोलीस सक्रिय झालेत, तसेच आता निनावी फोन करणाऱ्या व्यक्तीचा पोलिसांनी शोध सुरू केलाय. एका अज्ञात व्यक्तीने मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन केला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परदेश दौऱ्यादरम्यान त्यांच्या विमानावर दहशतवादी हल्ला होणार असल्याचा दावा केलाय, असे एका अधिकाऱ्याने बुधवारी सांगितले.

पंतप्रधान मोदी सध्या फ्रान्सच्या दौऱ्यावर : खरं तर मंगळवारी हा फोन आला, त्यानंतर पोलिसांनी इतर एजन्सींनाही कळवले आणि या प्रकरणाची चौकशी सुरू केलीय, असे त्यांनी सांगितले. पंतप्रधान मोदी सध्या फ्रान्सच्या दौऱ्यावर आहेत आणि तेथून ते अमेरिकेला जाणार आहेत. पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यादरम्यान दहशतवादी त्यांच्या विमानावर हल्ला करू शकतात, असा दावा फोन करणाऱ्याने केल्याचं अधिकाऱ्यानं सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर दहशतवादी हल्ला होणार असल्याचा दावा करणाऱ्या एका व्यक्तीच्या फोनवरून सुरक्षा यंत्रणांना सतर्क करण्यात आलंय. मंगळवारी (11 फेब्रुवारी) मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला एक फोन आला, ज्यामध्ये इशारा देण्यात आला होता की, सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान मोदींच्या विमानावर दहशतवादी हल्ला करू शकतात.

या नंबरवरून यापूर्वीही कॉल आलेत : घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी इतर यंत्रणांना माहिती दिली आणि तपास सुरू केलाय. मुंबई नियंत्रण कक्षाला यापूर्वीही त्याच नंबरवरून विविध धमक्यांबाबत कॉल आले होते, जे नंतर बनावट असल्याचे निष्पन्न झालंय. अशा परिस्थितीत मुंबई नियंत्रण कक्षाला फोन करणारी व्यक्ती मानसिकदृष्ट्या आजारी असू शकते, असे मानले जाते, परंतु पोलीस अजूनही सतर्क आहेत आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करीत आहेत.

डिसेंबरमध्येही अशी धमकी मिळाली होती : मुंबई पोलिसांना अशी धमकी मिळण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. याआधी डिसेंबर 2024 मध्येही पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या. एका पोलीस अधिकाऱ्याने माहिती दिली होती की, ज्या नंबरवरून हा मेसेज वाहतूक पोलिसांच्या हेल्पलाइन नंबरवर पाठवण्यात आला, तो नंबर राजस्थानमधील अजमेरचा होता. त्यावेळीही धमकी देणारी व्यक्ती मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याचा संशय होता.

हेही वाचा-

  1. "...तर आम्ही पुढील लोकसभा लढवायची कशी?", दिल्ली निवडणूक निकालावरुन संजय राऊतांचा सवाल
  2. "शिवसेनाप्रमुख नाहीत या आनंदात भाजपाने निवडणुका लढवल्या",' संजय राऊत म्हणतात, "शिंदेंचं ऑपरेशन अमित शाह..."

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.