नवी दिल्ली- देश-विदेशातील करोडो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या साईबाबांचं गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. महाराष्ट्रातील सगळे भिकारी साई संस्थानच्या प्रसादालयातील मोफत जेवणासाठी शिर्डीत गोळा होत असल्याचं सांगत सुजय विखे पाटलांनी खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर आता शिर्डीत मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढल्याचंही चित्र समोर आलंय. गेल्या सोमवारी साईबाबा संस्थानच्या दोन निष्पाप कर्मचाऱ्यांची लुटीच्या उद्देशाने निर्घृण हत्या करण्यात आली होती, त्यानंतर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत नागरिकांनी कारवाई करण्याची मागणी केली होती.
शिर्डीतील विविध भागात 100 पोलिसांचा फौजफाटा : विशेष म्हणजे साई संस्थानमधील दोन कर्मचाऱ्यांच्या हत्येनंतर शिर्डी पोलिसांसह शासनाच्या विविध विभागाचे अधिकारी आता ऍक्शन मोडवर आलेत. शिर्डीतील विविध भागात 100 पोलिसांचा फौजफाटा फिरत असून, रस्त्यावर विक्री करणारे, भक्तांची अडवणूक करत त्यांना विशिष्ट दुकानातून वस्तू खरेदी करण्याची सक्ती करणारे कमिशन एजंट, अवैध प्रवास करणारी वाहने यांच्यावर कार्यवाही सुरू केली जातेय.
![Shirdi all the agency are on action mode](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/07-02-2025/shirdipoliceinactionmood_07022025131219_0702f_1738914139_302.jpg)
![Shirdi all the agency are on action mode](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/07-02-2025/shirdipoliceinactionmood_07022025131219_0702f_1738914139_322.jpg)
हॉटेल अन् लॉजचा वापर अनैतिक कामांसाठी टाळा : साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी शहरातील हॉटेल आणि लॉज मालकांनी विविध सूचनांचे पालन करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलंय. हॉटेलमध्ये रूम देताना ग्राहकांचे आधारकार्ड, ओळखपत्र घेऊन त्याची प्रत ठेवा, ग्राहकांचे नाव, फोन नंबर आणि नातेवाईकांचा नंबर रजिस्ट्रारमध्ये नोंदवा, हॉटेल लॉजमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे चालू ठेवा. परदेशी नागरिकांची माहिती पोलिसांना द्या आणि सी फॉर्म जमा करा. काही संशयास्पद दिसल्यास पोलिसांना कळवा, हॉटेल अन् लॉजचा वापर अनैतिक कामांसाठी करू नका, या सूचनांचे पालन न केल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिलाय.
हेही वाचा -