गॉल Steve Smith Record : ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथनं पुन्हा एकदा शतक ठोकून चमत्कार केला आहे. गॉल इथं खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटीत स्मिथनं 191 चेंडूत शतक झळकावलं. स्मिथच्या कारकिर्दीतील हे 36 वं कसोटी शतक आहे. स्मिथनं गॉलमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीतही शतक झळकावलं होतं. त्यानं त्या सामन्यात 141 धावांची खेळी खेळली होती. या शतकासह स्टीव्ह स्मिथनं अनेक मोठे टप्पे गाठले आहेत. कसोटीत सर्वाधिक शतकं करण्याच्या बाबतीत त्यानं राहुल द्रविड आणि जो रुट यांची बरोबरी केली आहे. या दोन्ही दिग्गजांनी कसोटीत 36 शतकं केली आहेत. एवढंच नाही तर, सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतके ठोकण्याच्या बाबतीत स्मिथनं आता रोहितची बरोबरी केली आहे. त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 48 शतकं झळकावली आहेत.
👑👑👑 #SLvAUS pic.twitter.com/PHnrdRxnrV
— cricket.com.au (@cricketcomau) February 7, 2025
स्मिथ पुन्हा बनला रन मशीन : भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेपूर्वी स्टीव्ह स्मिथला शतकाची आस होती. या खेळाडूनं 12 कसोटी सामन्यात एकही शतक झळकावलं नव्हतं. स्मिथचं शतक 32 वरच थांबलं होतं पण भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान तो फॉर्ममध्ये आला आणि तेव्हापासून या खेळाडूनं गेल्या पाच कसोटी सामन्यांमध्ये चार शतकं झळकावली आहेत. या खेळाडूनं 50 दिवसांत 32 ते 36 कसोटी शतकं पूर्ण केली आहेत.
Test century no. 3️⃣6️⃣ for Australia talisman Steve Smith 👏#WTC25 | #SLvAUS 📝: https://t.co/PVPw6kFuGn pic.twitter.com/PpKPvAqOj7
— ICC (@ICC) February 7, 2025
स्मिथनं अॅलन बॉर्डर-पॉन्टिंगला टाकलं मागे : या शतकासह स्टीव्ह स्मिथनं रिकी पॉन्टिंग आणि अॅलन बॉर्डर सारख्या दिग्गजांना मागे टाकलं आहे. तो आता आशियाई भूमीवर सर्वाधिक शतकं करणारा ऑस्ट्रेलियन खेळाडू बनला आहे. या खेळाडूनं आशियामध्ये खेळलेल्या 43 डावांमध्ये 7 शतकं केली आहेत. आशियामध्ये बॉर्डरनं 6 शतकं आणि पॉन्टिंगनं 5 शतकं झळकावली. स्टीव्ह स्मिथ आशियामध्ये सर्वाधिक धावा करणारा ऑस्ट्रेलियन खेळाडूही बनला आहे. त्यानं 1889 धावा करणाऱ्या रिकी पॉन्टिंगला मागे टाकलं.
STEVE SMITH HAS MOST TEST HUNDREDS IN ASIA BY AN AUSTRALIAN PLAYER. 🐐🔥
— All Cricket Records (@Cric_records45) February 7, 2025
Most Test hundred by Australians in Asia
7 - STEVE SMITH
6 - Alan Border
5 - Usman Khawaja
5 - Ricky Ponting pic.twitter.com/lo7hQAhrRB
स्टीव्ह स्मिथनं कोणत्या देशात किती शतकं केली? : स्टीव्ह स्मिथनं ऑस्ट्रेलियामध्ये त्याच्या कसोटी कारकिर्दीत सर्वाधिक 18 शतकं केली आहेत. याशिवाय त्यानं इंग्लंडमध्ये 8 कसोटी शतकं झळकावली आहेत. या दिग्गजानं श्रीलंकेत 4 शतकं झळकावली आहेत. स्मिथनं भारतीय भूमीवर 3 शतकं झळकावली आहेत. तर न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजमध्ये प्रत्येकी एक शतक झळकावलं आहे.
17 HUNDREDS IN JUST 69 INNINGS AS A CAPTAIN—THAT'S MIND-BOGGLING! 😱
— All Cricket Records (@Cric_records45) February 7, 2025
Most Test 100s by captains:
25 - Graeme Smith (193 innings) 🇿🇦
20 - Virat Kohli (113 innings) 🇮🇳
19 - Ricky Ponting (140 innings) 🇦🇺
17* - STEVE SMITH (69 innings) 🇦🇺 pic.twitter.com/bzFki4E3QR
हेही वाचा :