मुंबई : ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा आणि तिचा पती निक जोनास जिथे जातात तिथे सर्वांचे लक्ष वेधून घेतात. या सुंदर जोडप्याचे अनेक चाहते आहेत. सौंदर्यानं आणि प्रतिभेनं सर्वांचे लक्ष कसे वेधून घ्यायचे हे या जोडप्याला चांगलेच माहित आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रियांका भाऊ सिद्धार्थ चोप्राच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमात व्यग्र आहे. अलीकडेच, संगीत समारंभ पार पडला आणि प्रियांकाच्या रॉकस्टार पतीनं अद्भुत सादरीकरण करून सर्वांना खुश केलं. हळदी आणि मेहंदीचा कार्यक्रम झाल्यानंतर सिद्धार्थ चोप्राचा संगीत समारंभ आयोजित करण्यात आला होता. यामध्ये प्रियांका चोप्राचा पती गायक निक जोनासनं कुटुंबासह खूप मजा केली.
प्रियांका आणि निकचा व्हिडिओ व्हायरल : प्रियांका तिच्या रॉकस्टार पती आणि सासू-सासऱ्यांबरोबर फोटोसाठी यावेळी पोझ देखील देताना दिसली. सिद्धार्थ चोप्राच्या संगीत समारंभातील प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांच्या सादरीकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. एका फॅन पेजनं त्यांच्या इंस्टाग्रामवर या जोडप्याचे काही व्हिडिओ पोस्ट केले आहेत. एका व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये हे जोडपे त्यांच्या कारमधून उतरून संगीत समारंभाच्या ठिकाणी जाताना दिसत आहे. समारंभाला उपस्थित राहण्यापूर्वी, या जोडप्यानं मीडियासमोर एकत्र पोझ दिली. यावेळी 'देसी गर्ल'नं गोड हावभावही दिले. तसेच फोटो क्लिक करताना, 'देसी गर्ल'नं तिच्या भावी वहिनीचा ड्रेस देखील दुरुस्त केला.
निकनं गायलं सुंदर गाणं : निक आणि प्रियांका हे जोडपे नेव्ही ब्लू रंगाचा ड्रेसमध्ये एकत्र खूप सुंदर दिसत होते. संगीत समारंभात प्रियांका आणि निक यांनी एकत्र परफॉर्म केलं. या कार्यक्रमात निक गाणं गाताना आणि देसी गर्ल' डान्स करताना दिसली. याशिवाय निकनं त्याच्या वडिलांबरोबर देखील स्टेजवर परफॉर्म केलं. या कार्यक्रमात निकनं 'तू मान मेरी जान' सारखी अनेक गाणी गायली. तसेच प्रियांकानं तिच्या भावी वहिनीबरोबर स्टेजवर डान्स केला. दरम्यान प्रियांकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती एसएस राजामौली यांच्या तात्पुरते शीर्षक अससेल्या 'एसएसएमबी 29'मध्ये दिसणार आहे. या चित्रपटाची शूटिंग ही लवकरच सुरू होणार आहे. प्रियांका भारतीय चित्रपटसृष्टीत पुनरागमन करत आहे. तसेच शेवटी ती 2019मध्ये प्रदर्शित झालेल्या 'द स्काय इज पिंक' या हिंदी चित्रपटात दिसली होती.
हेही वाचा :