'धर्मवीर 2' चित्रपटावर टीका करणार्‍यांना प्रविण तरडेंनी दिलं प्रत्युत्तर, नेमकं काय म्हणाले? - Pravin Tarde On Sushma Andhare - PRAVIN TARDE ON SUSHMA ANDHARE

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 28, 2024, 9:47 PM IST

पुणे : बहुप्रतिक्षित 'धर्मवीर 2' चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानं या चित्रपटावर विरोधकांकडून टीका केली जात आहे. जे घडलंच नाही, ते दाखवण्याचा प्रयत्न या चित्रपटात केल्याचा आरोप होत आहे. "मतांसाठी निवडणुकीसाठी थुकरट युक्ती तरडेंनी दाखवलीय. प्रवीण तरडे कलेशी बेईमानी म्हणतात ती हीच का?," असं ट्विट करत सुषमा अंधारेंनी केलं होतं. याबाबत चित्रपटाचे दिग्दर्शक प्रवीण तरडे यांना याबाबत विचारलं असता ते म्हणाले की, "चित्रपटात कुणाचही नाव घेण्यात आलं नाही, सुषमा अंधारे यांना गैरसमज झालाय. ज्यांनी सिनेमा पाहिला आहे, त्यांना कोणालाही प्रश्न पडलेला नाही. विरोधकांनी पाहिला तर, त्यांना देखील चित्रपट आवडेल. कारण, या चित्रपटात दिघे साहेबांच्या, बाळासाहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट आहे. त्यामुळं सिनेमा पाहिल्यानंतर कोणाला प्रश्न पडणार नाही."

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.