संतोष देशमुख हत्या प्रकरण; पीएसआय राजेश पाटील आणि आरोपी भेटल्याचा व्हिडीओ आला समोर - SANTOSH DESHMUKH MURDER CASE
🎬 Watch Now: Feature Video
Published : 5 hours ago
बीड : केज तालुक्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. त्यांच्या हत्येमुळं संपूर्ण राज्यात खळबळ माजली आहे. या प्रकरणात पोलिसांची भूमिका असल्याचा आरोप संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांकडून करण्यात आला होता. त्याच अनुषंगानं पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांचं चार दिवसापूर्वीच निलंबन करण्यात आलं आहे. राजेश पाटील आणि या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले हे केज शहरातील एका हॉटेलमध्ये भेटल्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. त्यामुळं या प्रकरणाची देखील चौकशी करावी, अशी मागणी केली जातं आहे. तसंच "संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात कसलाही जातीयवाद नाही. तो खून कोणत्या कारणावरून झाला हे बीड जिल्ह्यातील जनतेला चांगलं माहीत आहे. या प्रकरणात कुठलाही जातिवाद नाही आणि राजकारण तर नाहीच नाही," असं माजलगाव येथील आमदार प्रकाश सोळंके यांनी म्हटलं आहे.