"महायुतीतील प्रलंबित मंत्रिपद...", नेमकं काय म्हणाले रामदास आठवले? पाहा व्हिडिओ - MAHARASHTRA CABINET EXPANSION
🎬 Watch Now: Feature Video
Published : 3 hours ago
नवी दिल्ली : देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) रविवारी (15 डिसेंबर) नागपूरच्या राजभवनात पार पडला. यावेळी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी नवीन 39 मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मात्र, या मंत्रिमंडळात आरपीआय पक्षाचे प्रमुख रामदास आठवले यांच्या पक्षाला मंत्रिपद न मिळाल्यामुळं त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या संदर्भात 'ईटीव्ही भारत'शी संवाद साधत असताना ते म्हणाले की, "मंत्रिमंडळ विस्तारात आरपीआयला एक मंत्रिपद देण्याचं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं. मात्र, ते त्यांनी पाळलं नाही. त्यामुळं आरपीआय पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात नाराज आहेत. हायकमांडनं फडणवीस यांच्याशी बोलण्यास सांगितलं होतं. परंतु, त्यांची भेट घेऊनही तोडगा निघाला नाही." मात्र, असं असलं तरी भाजपा नेतृत्व यावर विचार करेन, अशी अपेक्षा आठवलेंनी व्यक्त केलीय. तसंच पक्ष नाराज असला तरी पंतप्रधान मोदींना नेहमीच पाठिंबा देणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. आरपीआयला महायुतीतील प्रलंबित असलेलं मंत्री पद मिळू शकतं, अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.