मल्लन्न बोनालू उत्सवाची मोठ्या उत्साहात सांगता; तीन राज्यांतील हजारो भाविकांनी घेतलं मल्लिकार्जुनाचं दर्शन - BONALU FESTIVAL 2024
🎬 Watch Now: Feature Video


Published : Dec 17, 2024, 8:05 PM IST
गडचिरोली : सिरोंचा तालुक्याच्या मुख्यालयापासून 8 किलोमीटर अंतरावर असलेल्या आरडा गावातील मल्लिकार्जुन स्वामी मंदिर परिसरात दोन दिवसीय मल्लन्न बोनालू (जत्रा) उत्सवाची मोठ्या उत्साहात सांगता झाली. यावेळी महाराष्ट्र आणि तेलंगणा तसंच छत्तीसगड राज्यातील जवळपास 30 ते 35 हजार भाविकांच्या गर्दीनं मल्लिकार्जुन स्वामी मंदिराचा परिसर फुलून गेला होता. गेल्या 100 वर्षांपासून मल्लन्न बोनालू उत्सव साजरा केला जात आहे. भाविकांनी यावेळी मंदिराभोवती प्रदक्षिणा घालून मल्लिकार्जुन स्वामींना नैवेद्य दाखवून सुख-समृद्धीसाठी नवस केले. भाविकांना त्रास होऊ नये म्हणून मंदिर समितीनं व्यवस्था केली होती. हा उत्सव नक्षल प्रभावित क्षेत्रात होत असल्यामुळं जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली जत्रेदरम्यान अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.