ETV Bharat / state

मुंबई भाजपा अध्यक्षपदाच्या शर्यतीत कोण मारणार बाजी? - BRIHANMUMBAI MUNICIPAL CORPORATION

भाजपात 'एक व्यक्ती एक पद' या अनुषंगाने भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलारांची मंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर आता मुंबई भाजपा अध्यक्षपद कुणाकडे जाणार यावर चर्चा सुरू झालीय.

Who will beat the race for Mumbai BJP president
मुंबई भाजपा अध्यक्षपदाच्या शर्यतीत कोण मारणार बाजी? (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : 2 hours ago

मुंबई - राज्यात देवेंद्र फडणवीस यांचं सरकार स्थापन झाल्यानंतर आता सर्वांना स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. विधानसभा निवडणुकीत दमदार कामगिरी केल्यानंतर भाजपा आता मुंबई महापालिकेवर कब्जा करण्यासाठी पूर्णपणे सज्ज झालीय. मागील तीन दशकांपासून उद्धव ठाकरेंच्या ताब्यात असलेली मुंबई महापालिका स्वतःच्या ताब्यात घेण्यासाठी भाजपाने मुंबईत नव्याने रणनीती आखण्यास सुरुवात केलीय. भाजपात 'एक व्यक्ती एक पद' या अनुषंगाने भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांची मंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर आता मुंबई भाजपा अध्यक्षपद कुणाकडे जाणार यावर चर्चा सुरू झाली असून, मुंबईतील अनेक चेहरे समोर आलेत.

मुंबई जिंकण्यासाठी शर्थीचे प्रयत्न : विधानसभेत पराभव पत्करावा लागला तरी कुठल्याही परिस्थितीत मुंबई महापालिका हातून निसटता कामा नये, यासाठी उबाठा गटाने आतापासूनच तयारी सुरू केलीय. राज्यात विधानसभा निवडणुकीत उबाठा गटाची कामगिरी निराशाजनक असली तरी मुंबईत उबाठाने 10 जागा जिंकून मुंबईवरील आपलं वर्चस्व कायम ठेवलंय. दुसरीकडे महायुतीकडून मुंबई महापालिकेवर यंदा भगवा फडकवण्यासाठी कुठलीही कसर ठेवली जाणार नाही. विशेषतः भाजपाने विधानसभा निवडणुकीपूर्वी मुंबई महापालिका निवडणूक लक्षात ठेवून मुंबईत तिकीट वाटप केले होते. यापूर्वी मुंबई महापालिकेची अखेरची निवडणूक ही 2017 मध्ये झाली होती. तेव्हा राज्यात शिवसेना-भाजपा युतीचं सरकार होतं. परंतु मुंबई महापालिका निवडणूक दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले होते आणि शिवसेनेनं 84 तर भाजपाने 82 जागी विजय संपादन केला होता. 2012 च्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत जागा जिंकणाऱ्या भाजपाने 2017 च्या निवडणुकीत 82 जागांपर्यंत मजल मारली होती आणि भाजपाने ही सर्व किमया मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या नेतृत्वात केली होती. परंतु यंदा आशिष शेलार यांची मंत्रिमंडळात वर्णी लागल्यामुळे मुंबई अध्यक्षपदाची माळ आता कुणाच्या गळ्यात पडते, याकडे साऱ्यांचे लक्ष लागलंय.

2017 च्या निवडणुकीत भाजपाची 82 जागांपर्यंत मजल : विशेषतः भाजपाने विधानसभा निवडणुकीपूर्वी मुंबई महापालिका निवडणूक लक्षात ठेवून मुंबईत तिकीट वाटप केले होते. यापूर्वी मुंबई महापालिकेची अखेरची निवडणूक ही 2017 मध्ये झाली होती. तेव्हा राज्यात शिवसेना-भाजपा युतीचं सरकार होतं. परंतु मुंबई महानगरपालिका निवडणूक दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले होते आणि शिवसेनेनं 84 तर भाजपाने 82 जागी विजय संपादन केला होता. 2012 च्या मुंबई महापालिका निवडणुकीत जागा जिंकणाऱ्या भाजपाने 2017 च्या निवडणुकीत 82 जागांपर्यंत मजल मारली होती आणि भाजपाने ही सर्व किमया मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या नेतृत्वात करून दाखवली होती. परंतु यंदा आशिष शेलार यांची मंत्रिमंडळात वर्णी लागल्यामुळे मुंबई अध्यक्षपदाची जागा रिक्त झालीय.

माजी आमदार सुनील राणेंचं नाव अग्रस्थानी : भाजपा मुंबई अध्यक्षपदाच्या शर्यतीत सर्वात अग्रेसर नाव बोरिवलीचे माजी आमदार सुनील राणे याचं आहे. सुनील राणे यांनी २०१९ मध्ये बोरिवली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि ते जिंकून आले. परंतु २०२४ च्या निवडणुकीत त्यांचा पत्ता कट करून भाजपाने संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिली आणि उपाध्यय सुद्धा या मतदारसंघातून विजयी झाले. परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोकसभा निवडणुकीत उत्तर मुंबईचे खासदार गोपाल शेट्टी यांचा भाजपाने पत्ता कापल्या नंतर त्यांनी बंडाचा पवित्रा घेतला होता. परंतु सुनील राणे यांचा विधानसभेत पत्ता कापल्यानंतर ते शांत राहिले त्यांनी संयमाची भूमिका घेतली. त्यातच फळं आता त्यांना भेटू शकतं. सुनील राणे यांच्याबरोबर कांदिवलीचे आमदार अतुल भातखळकर, अंधेरी पश्चिम चे आमदार अमित साटम आणि लोकसभा निवडणुकीत तिकीट कापण्यात आलेले माजी खासदार मनोज कोटक यांचाही नंबर अध्यक्षपदाच्या शर्यतीत आहे. अशात अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हेही वाचा :

  1. एकनाथ शिंदेंची नवीन ओळख 'लाडका भाऊ' कशामुळं? 'ही' योजना ठरली गेमचेंजर
  2. लोकसभा अन् विधानसभा निवडणुकीनंतर आता एकनाथ शिंदेंचं लक्ष्य पालिका निवडणुकीवर, विजयाची रणनीती काय?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.