राज ठाकरे यांचे अमरावती जल्लोषात स्वागत; विदर्भातील विधानसभेच्या सर्व जागांचा घेणार आढावा - Raj Thackeray In Amravati - RAJ THACKERAY IN AMRAVATI
🎬 Watch Now: Feature Video
Published : Sep 27, 2024, 10:21 AM IST
अमरावती Raj Thackeray visit to Amravati : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आजपासून (27 सप्टेंबर) दोन दिवस अमरावती दौऱ्यावर आहेत. अमरावती रेल्वे स्थानकावर सकाळी त्यांचं आगमन होताच कार्यकर्त्यांनी पुष्पवर्षाव आणि फटाक्यांची आतषबाजी करून त्यांचं स्वागत केलं. अमरावती रेल्वे स्थानकावरून राज ठाकरे हे हॉटेल मॅप इन येथे पोहोचले. सकाळी दहा वाजल्यापासून ते अमरावती विभागातील विधानसभा निहाय पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. अमरावती विभागातील अमरावती अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ या पाचही जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. दरम्यान, अमरावती विभागातील पाचही जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांची आज बैठक घेतल्यावर शनिवारी नागपूर महसूल विभागातील नागपूर, चंद्रपूर, भंडारा, वर्धा, गोंदिया आणि गडचिरोली या सहा जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सोबत राज ठाकरे चर्चा करणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रणनीती ठरवणं यासह योग्य उमेदवारांची चाचपणी हा या दौऱ्यामागचा उद्देश असल्याचं सांगण्यात येत आहे.