ETV Bharat / politics

"सावित्रीबाईंनी मुलींसाठी शिक्षणाची वाट खुली केली, तर सरकारनं 'लाडकी बहीण योजने'तून..." - CM Eknath Shinde On Phule

CM Eknath Shinde On Phule : नाशिक शहरात क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचं भव्यदिव्य स्मारक उभारण्यात आलंय. या स्मारकाचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते शनिवारी लोकार्पण करण्यात आलं.

Mahatma Phule And Savitribai Phule
महात्मा फुले, सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 28, 2024, 10:24 PM IST

नाशिक CM Eknath Shinde On Phule : महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले सामाजिक समतेचे प्रतीक आहेत. त्यांनी शेतकरी, कामगार, महिला आणि कष्टकऱ्यांसाठी आपलं सर्वस्व अर्पण केलं. त्यांचं कार्य महाराष्ट्राबरोबरच जगासाठी वंदनीय आहे. अशा महापुरुषांची स्मारकं प्रेरणादायी, ऊर्जा देणारी आणि जीवनाला दिशा देणारी असतात, असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केलं.

स्मारकाचं लोकार्पण : मंत्री छगन भुजबळ यांच्या संकलपनेतून नाशिक महानगरपालिकेतर्फे मुंबई नाका येथे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचं स्मारक साकारण्यात आलंय. या स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री दादा भुसे उपस्थित होते.

महात्मा फुले, सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा (Source : Samata Parishad)

भिडे वाड्याचं स्मारकात होणार रुपांतर : "फुले दांम्पत्यांचं काम उत्तुंग आहे. त्यांच्या आदर्शानुसार वाटचाल करणं हे आपले कर्तव्य आहे. राज्यातच सामाजिक समतेचा पाया घातला गेला. महाराष्ट्र हे पुरोगामी आणि प्रगतिशील राज्य आहे. त्यामागं महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज आणि महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं कार्य आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांना आपलं गुरू मानलं होतं. महात्मा ज्योतिराव फुले यांनी शेतकरी, कामगार आणि शोषितांचे प्रश्न मांडत तत्कालीन व्यवस्थेवर आसूड ओढले. पुण्यातील मुलींची पहिली शाळा असलेल्या भिडे वाड्याचं स्मारकात रुपांतर करण्यात येणार आहे," अशी माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.

मुलींसाठी शिक्षणाची वाट प्रशस्त करून दिली : "राज्यात औद्योगिक विकास आणि पायाभूत सुविधांद्वारे राज्य आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यातून सामाजिक न्यायाच्या क्षेत्रात चांगलं काम करता येणार आहे. शिक्षण, आरोग्य, कृषी, सिंचन, रोजगार-स्वयंरोजगार, उद्योग, कौशल्य विकासात आपण सर्व घटकांचा विचार करत आहोत. क्रांतिज्योती सावित्रीबाईंनी मुलींसाठी शिक्षणाची वाट प्रशस्त करून दिली. आता 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेतून आर्थिक दिलासा देण्याचा प्रयत्न केला जात आहे," असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

फुले दांम्पत्यांनी समाजात परिवर्तन घडवलं : "महात्मा फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी समतेचा, संविधानाचा मार्ग दाखवला. त्याच मार्गावरून आपल्याला वाटचाल करायची आहे. महात्मा फुले यांनी प्रवाहाच्या विरोधात जाऊन समाज सुधारण्यासाठी लढा दिला. ते युग पुरुष होते. त्यांनी असामान्य कामगिरी बजावली. त्यांनी समाजाला दिशा देण्याचं काम केलं. त्यांनी समाजाला शिक्षणाचा मंत्र दिला. त्यामुळं परिवर्तन घडून आलं. सामाजिक कार्यात त्यांचं नाव अग्रेसर राहील," असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

भारतरत्न देण्यासाठी पाठपुरावा करणार : "महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी सामाजिक समतेचा लढा देत स्त्री शिक्षणाचा पाया रचला. त्यांनी दिलेल्या सत्यशोधक विचारांवर देश उभा आहे. त्यांच्या विचारांचा वारसा आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे. मुलींची देशातील पहिली शाळा 'भिडे वाडा' राष्ट्रीय स्मारक उभारण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे. तेथे मुलींची शाळा सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल. फुले दांम्पत्याला भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल. महात्मा फुले यांच्या मूळ गावी आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा सुरू करण्यात येणार आहे. नाशिकमध्ये उभारण्यात आलेले स्मारक उत्तम असून नाशिकच्या वैभवात भर घालणारे आहे," असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं.

देशातील सर्वात मोठा अर्ध पुतळा : "महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांनी आयुष्यात विविध संकटांचा सामना केला. त्यानंतरही त्यांनी आपलं कार्य सुरू ठेवलं. त्यांनी सर्व क्षेत्रात महान कार्य केलंय. त्यांनी विविध सामाजिक प्रश्न हाताळले. प्लेगच्या साथीत त्यांनी रुग्णांची सेवा केली. त्यांनी सर्वच पंथांचा विचार केला आहे. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे अर्ध पुतळे हे देशातील सर्वांत मोठे आहेत. त्यांनी केलेले काम कायम संस्मरणीय आहे. सर्वांना शिक्षण, शेतकऱ्यांना मदत आणि महिलांचे सबलीकरण हे सावित्रीबाई फुले यांचं स्वप्न साकारण्याचं काम राज्य शासन करत आहे," असं मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलं.

हेही वाचा -

  1. देशातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी; वाचा त्यांचं कार्य
  2. देशातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची आज जयंती, वाचा त्यांच्या संघर्षाची कहाणी
  3. महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाईंची संघर्षगाथा मोठ्या पडद्यावर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.