मुंबई Karun Nair Not in Squad : 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताचा क्रिकेट संघ जाहीर झाला आहे. 19 फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या या स्पर्धेसाठी भारताच्या 15 सदस्यीय संघात अनेक स्टार खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. तथापि, निवडकर्त्यांनी संघ निवडताना काही आश्चर्यकारक निर्णय देखील घेतले. देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत तब्बल 752 च्या सरासरीनं धावा करत आहे. पण या दमदार कामगिरीनंतरही हा खेळाडू टीम इंडियामध्ये आपलं स्थान निर्माण करू शकला नाही.
We are waiting on Jasprit Bumrah's fitness and will know his status in early February from BCCI's medical team: Chief selector Ajit Agarkar
— Press Trust of India (@PTI_News) January 18, 2025
Rishabh Pant is the first-choice wicketkeeper batter in CT and England ODI squads
Wrist-spinner Kuldeep Yadav finds a place in squads for… pic.twitter.com/6sTTkA4M6C
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये मिळालं नाही स्थान : भारतीय क्रिकेटची देशांतर्गत स्पर्धा विजय हजारे ट्रॉफीमध्ये विदर्भाचा कर्णधार करुण नायरची बॅट चांगली कामगिरी करत आहे. तो जवळजवळ प्रत्येक सामन्यात मोठ्या खेळी खेळत आहे. अशा परिस्थितीत, त्याच्या फॉर्मकडे पाहून निवड समिती मोठा निर्णय घेऊ शकते अशी अपेक्षा होती. पण असं झालं नाही, करुण नायर भारतीय संघात परतला नाही. पत्रकार परिषदेत संघ घोषणेदरम्यान, जेव्हा मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांना करुण नायरची निवड न करण्याबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्यांनी उत्तर दिलं की सध्या संघात त्याच्यासाठी जागा नाही.
Indian Cricket Team for Champions Trophy: Rohit Sharma (C), Virat Kohli, S Gill (VC), S Iyer, KL Rahul, Hardik Pandya, Axar Patel, Washington Sundar, Kuldeep Yadav, Jasprit Bumrah, M Shami, Arshdeep, Y Jaiswal, R Pant and R Jadeja. pic.twitter.com/GBuEWg82rc
— ANI (@ANI) January 18, 2025
काय म्हणाले आगरकर : करुण नायरची निवड न करण्याबद्दल मुख्य निवडकर्ता अजित आगरकर म्हणाले, "करुण नायरच्या फॉर्मवर चर्चा झाली आणि अशी कामगिरी सहसा होत नाही. सध्या त्याला या संघात स्थान मिळवणं खूप कठीण होतं. सरासरी 750+ म्हणजे अगदी वेडेपणा आहे. दुर्दैवानं आम्ही या संघात सर्वांना समाविष्ट करु शकत नाही. ही 15 जणांची टीम आहे. ही कामगिरी नक्कीच तुमची दखल घेण्यास भाग पाडते. जर फॉर्म कमी झाला किंवा दुखापत झाली तर करुण नायरला संधी मिळू शकते."
NO KARUN NAIR.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) January 18, 2025
Ajit Agarkar said, " averaging 750+ is simply insane, but it's a squad of 15, so we can't fit everyone". pic.twitter.com/nC8feDmRom
विजय हजारे ट्रॉफीमध्ये दमदार कामगिरी : विजय हजारे ट्रॉफीमध्ये करुण नायरनं आतापर्यंत 7 डावात 752.00 च्या सरासरीनं 752 धावा केल्या आहेत. यामध्ये 5 शतकं आणि 1 अर्धशतक समाविष्ट आहे. या काळात त्यानं सलग 4 सामन्यांमध्ये शतकं झळकावली आहेत. तो या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही आहे. हे सर्व असूनही, त्याला संघात स्थान देण्यात आलेलं नाही. अशा परिस्थितीत, सोशल मीडियावरही, क्रिकेट चाहते त्याची निवड न झाल्यानं आश्चर्यचकित झाले आहेत. करुण नायरनं आतापर्यंत टीम इंडियासाठी 6 कसोटी आणि 2 वनडे सामने खेळले आहेत. पण 2016 पासून तो टीम इंडियासाठी एकही वनडे सामना खेळलेला नाही. त्यानं शेवटचा कसोटी सामना देखील 2017 मध्ये खेळला होता.
हेही वाचा :