हैदराबाद : भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 मध्ये हिरो मोटोकॉर्पनं चार नवीन दुचाकींचं सादरीकरण केलं. कंपनीनं एकाच वेळी ग्राहकांसाठी चार नवीन बाईक आणि दोन नवीन स्कूटर सादर केल्या आहेत. हिरोच्या या नवीन श्रेणीमध्ये, Xtreme 125, Xtreme 250R, Xtreme 160, Xoom 125, Xpulse 210 आणि Xoom 160 अशा चार दुचाकी सादर करण्यात आल्या.
हिरोच्या नवीन बाइक्स Xtreme 125, Xtreme 160, Xtreme 250R, Xpulse 210 व्यतिरिक्त, Xoom 125 आणि Xoom 160 या दोन नवीन स्कूटर देखील कंपनीनं सादर केल्या आहेत. हिरो मोटोकॉर्पच्या या बाईक्स आणि स्कूटर्सची बुकिंग पुढील महिन्यापासून म्हणजेच फेब्रुवारी 2025 पासून सुरू होण्याची शक्यता आहे. त्यांची डिलिव्हरी मार्च २०२५ पासून सुरू होण्याची अपेक्षा आहे.
हिरो झूम 125 ची भारतातील किंमत
Hero MotoCorp नं 125 सीसी सेगमेंटमध्ये नवीन Xoom 125 स्कूटर लाँच केली आहे, या स्कूटरची सुरुवातीची किंमत 86,900 रुपये (एक्स-शोरूम) निश्चित करण्यात आली आहे. ही स्कूटर फक्त 7.6 सेकंदात 0 ते 60 पर्यंत वेग पकडते. यासह, ही स्कूटर या विभागातील सर्वात वेगवान स्कूटर बनली आहे. या स्कूटरमध्ये 14 इंच चाकं आणि मोठे टायर आहेत, जी तुमचा रायडिंग अनुभव सुधारण्यास मदत करेल.
हिरो झूम 160 ची भारतातील किंमत
Hero Xoom 160 बद्दल बोलायचं झाले तर, ही कंपनीनं लिक्विड कूल्ड इंजिनसह लाँच केलेली पहिली स्कूटर आहे. या स्कूटरची किंमत 1,48,500 रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होते.
हिरो एक्सपल्स 210 ची भारतातील किंमत
हिरो एक्सपल्स 210 ही एक साहसी मोटरसायकल आहे, जी ऑफ-रोडिंगमध्येही उत्तम अनुभव देईल, ही बाईक दोन प्रकारांमध्ये सादर करण्यात आली आहे. या बाईकची किंमत 1,75,800 रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होते. या बाईकमध्ये 210 सीसी सिंगल सिलेंडर लिक्विड कूल्ड इंजिन आहे, जे 24.6 bhp पॉवर आणि 20.7 Nm टॉर्क जनरेट करतं.
हिरो एक्सट्रीम 250 आरची भारतातील किंमत
Hero Xtreme 250R ची किंमत 1लाख 80 हजार रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होते. कंपनीनं या बाईकमध्ये 250 सीसी लिक्विड कूल्ड सिंगल सिलेंडर इंजिन दिलं आहे, जे 30bhp पॉवर आणि 25Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे.
हे वाचलंत का :
- होंडा ॲक्टिव्हा ई आणि होंडा क्यूसी1 इलेक्ट्रिक स्कूटर लाँच, जाणून घेऊया फिचर आणि किंमत...
- टोयोटाच्या बहुप्रतिक्षित टोयोटा अर्बन क्रूझर ईव्हीचा पहिला लूक आला समोर, जाणून घ्या काय असेल खास?
- भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 मध्ये 'या' कार झाल्या सादर? जाणून घ्या A टू Z माहिती
- देशातील पहिली CNG स्कूटर सादर, 84 किमी मायलेजसह पेट्रोलवरही धावणार