ETV Bharat / state

गरोदर महिलेची आत्महत्या नाही तर खून; सासरच्या मंडळींनीच हत्या केल्याचं तपासात झालं उघड - PREGNANT WOMAN DEATH

संभाजीनगरच्या सिल्लोडमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका गरोदर महिलेची हत्या करण्यात आली. मात्र आत्महत्येचा बनाव रचण्यात आला.

Sambhajinagar Crime News
आत्महत्या नाही तर हत्या (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 18, 2025, 6:41 PM IST

छत्रपती संभाजीनगर : गरोदर असलेल्या सिल्लोडमधील विवाहितेच्या आत्महत्येचं धक्कादायक गूढ उकललं आहे. सासरच्या मंडळींनी हत्या केल्यावर तिनं आत्महत्या केल्याचा बनाव रचला होता. मात्र, मुलीच्या पोटावर बसून तिला मारहाण केल्याची तक्रार मृत महिलेच्या वडिलांनी सिल्लोड पोलीस स्टेशनात केली होती. शवविच्छेदन अहवालातून या महिलेची हत्या केल्याचं निष्पन्न झालं आहे. मनीषा सतीश सपकाळ असं मृत महिलेचं नाव असून पोलिसांनी पतीसह सासू, सासरे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केल्याची माहिती, पोलीस निरीक्षक शेषराव उदार यांनी दिली. तर या घटनेनं पैशांसाठी माणसातील संवेदना हरवत चालली आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

हत्या करून आत्महत्येचा बनाव : सिल्लोड शहरातील शास्त्री कॉलनीत राहणाऱ्या मनीषा सपकाळ या विवाहितेनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती सासऱ्यानं तिच्या वडिलांना फोन करून दिली. वडिलांनी तातडीनं मुलीचं घर गाठलं. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात नेण्यात आला. त्यावेळी मुलीचे वडील बंडू शेळके यांनी तिच्या सासरच्या मंडळींनी तिला मारल्याची तक्रार दिली. मात्र समोर असलेल्या परिस्थिती नुसार आत्महत्या केल्याचं दिसून येत होतं. परंतु, शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यावर महिलेचा मृत्यू हा मारहाणीमुळं झाल्याचं निष्पन्न झालं. त्यावरून सिल्लोड पोलिसांनी मृत महिलेचा पती सतीश लक्ष्मण सपकाळ, सासरा लक्ष्मण कडुबा सपकाळ, सासू लीलाबाई लक्ष्मण सपकाळ यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक शेषराव उदार यांनी दिली.

सासरचे करत होते छळ : मृत विवाहितेचे वडील बंडू किसन शेळके यांनी दिलेल्या तक्रारी नुसार, त्यांची मुलगी मनीषाचा विवाह सहा वर्षांपूर्वी सतीश सपकाळ यांच्याशी झाला. लग्न झाल्यावर मूलबाळ होत नसल्याच्या कारणावरून सासरच्या मंडळींनी शारीरिक आणि मानसिक त्रास दिला. इतकंच नाही तर पैश्याची मागणी देखील करत होते. संसार आहे म्हणून मुलीनं त्रास सहन केला, मात्र ती गरोदर असताना तिच्या पोटावर बसून तिला मारहाण केली आणि त्यातच तिचा मृत्यू झाला अशी तक्रार त्यांनी दिली. मात्र सासरच्या मंडळींनी आत्महत्येचा बनाव केला. मात्र शवविच्छेदन अहवालात वास्तव समोर आलं आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक शेषराव उदार यांनी दिली.

हेही वाचा -

  1. शालेय साहित्य न मिळाल्यानं मुलाची आत्महत्या; तर वडिलांनी तिथंच संपवली जीवनयात्रा
  2. नागपुरात जोडप्यानं लग्नाच्या ड्रेसमध्येच केली आत्महत्या; सोशल मीडियावर व्हिडिओ ठेवून दिला शेवटचा मेसेज
  3. माझ्या मुलीला सांभाळा...,सावकारी जाचाला कंटाळून रिक्षाचालकाची आत्महत्या; चार जणांवर गुन्हा दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.