ETV Bharat / state

अरुणा शानबाग यांची ४१ वर्षे सेवा करणाऱ्या केईएमचा अभ‍िमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्गार - CM DEVENDRA FADNAVIS

सेठ गोवर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालय आणि राजे एडवर्ड स्मारक रुग्णालयाचा (केईएम) शताब्दी वर्ष शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या हस्ते पार पडला.

Devendra Fadnavis
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 18, 2025, 8:53 PM IST

मुंबई : एखाद्या आरोग्य क्षेत्रातील संस्थेनं सुवर्ण किंवा शताब्दी महोत्सव साजरा करणं ही त्या संस्थेसाठी अभिमानास्पद बाब असते. मुंबईच्या आरोग्य क्षेत्रात राजे एडवर्ड स्मारक रुग्णालय अर्थात केईएमचं (KEM) नाव अग्रगण्य आहे. केईएम हे कुटुंब आहे, यामध्ये प्रत्येक व्यक्तीची काळजी घेतली जाते. अरुणा शानबाग यांची ४१ वर्षे सेवा केली. अशी सेवा करणारा केईएम हा एक परिवार आहे. अशा संस्थेचा अभिमान आहे. या संस्थेने आपल्या शताब्दी वर्षात पदार्पण केलं असून हे वर्ष समाजोपयोगी ठरावं, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

रुग्णालयाला ९९ वर्षे पूर्ण झाली : सेठ गोवर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालय आणि राजे एडवर्ड स्मारक रुग्णालय शताब्दी वर्ष शुभारंभ कार्यक्रमाचं आयोजन केईएम रुग्णालयात करण्यात आलं. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. १५ जानेवारी १९२६ रोजी या रुग्णालयात रुग्णांना दाखल करुन घेण्यास सुरूवात झाली होती. रुग्णालयाला आता ९९ वर्षे पूर्ण झाली आहेत. शताब्दी वर्षात पदार्पण करणाऱ्या केईएम रुग्णालयात संस्थेसाठी १०० वर्षांत समर्पण वृत्तीनं काम करणाऱ्या लोकांबद्दल गौरवोद्गार काढताना मुख्यमंत्री म्हणाले, "कोविडच्या काळात शासकीय रुग्णालयांनी खूप चांगलं काम केलं. त्यामुळं अनेकांचे जीव वाचले. कोविडच्या काळात शासकीय रुग्णालयाचं काम निश्चितच कौतुकास्पद होतं. केईएम हे कुटुंब आहे. केईएम‍ विद्यालयाचा इतिहास राष्ट्रवादाशी जोडलेला आहे.

कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (ETV Bharat Reporter)

रुग्णालयात अनेक चांगली कामे झाली : डॉ. के. एन. बहादूर हे लंडन येथून एम.डी. ही पदवी घेणारे पहिले भारतीय होते. मात्र, केवळ भारतीय असल्यामुळं त्यांना ग्रँट महाविद्यालयात प्राध्यापक पदाची नोकरी नाकारण्यात आली होती. त्या नकारातूनच या महाविद्यालयाची उभारणी झाली आहे. १०० वर्षे जेव्हा एखादी संस्था चालते, त्यामागे संस्थेचं काही वैशिष्ट्य असतं. या काळात या रुग्णालयात अनेक चांगली कामे झाली. त्याचा उल्लेख करणं महत्त्वाचं आहे. एक उल्लेख आवर्जून करायला हवा. ज्या प्रकारे अरुणा शानबाग यांची ४१ वर्षे ज्या आस्थेने सेवा-सुश्रुषा करण्यात आली, त्यातून केईएम हा एक पर‍िवार आहे आण‍ि त्यातील एका सदस्याची कशी काळजी घेतली पाहिजे, हे यातून दिसतं. अनेक इतिहासांशी जुळलेली ही वास्तू आण‍ि संस्था आहे. पुढच्या काळात अधिक चांगल्या प्रकारे ही संस्था काम करु शकेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

ड‍िस‍िज मॅनेजमेंटपासून क्रायसीस मॅनेजमेंटपर्यंत डॉक्टर्स श‍िकतात : "आरोग्य क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं परिवर्तन होत आहे. राज्य शासनही नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळण्यासाठी आरोग्य क्षेत्रामध्ये आमूलाग्र बद्दल करत आहे. नागरिकांना चांगल्या वैद्यकीय सेवा देणं, ही शासनाची प्राथमिकता आहे. सरकार आणि महापालिकेच्या रुग्णालयांवर असलेला ताण अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. या रुग्णालयांमध्ये खूप वेगवेगळया प्रकारचे आण‍ि मोठ्या संख्येने लोक येतात. त्यामुळं ड‍िस‍िज मॅनेजमेंटपासून क्रायसीस मॅनेजमेंटपर्यंत सगळ्या गोष्टी या ठ‍िकाणी आपले डॉक्टर्स शिकत असतात. त्यातूच चांगले डॉक्टर्स तयार होतात", असं फडणवीस म्हणाले.

महानायक अम‍िताभ बच्चन यांचा उल्लेख : "मुख्यमंत्र्यांनी एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख केला. ते म्हणाले, "ज्यांना महानायक म्हणतात ते अम‍िताभ बच्चन हे फॅटी लिव्हरसारख्या आजारासाठी आपल्या केईएम रुग्णालयातील डॉक्टरांचा सल्ला घेतात. ज्यांना जगभरातील सर्व डॉक्टर्स उपलब्ध आहेत. मात्र. ते केईएमच्या डॉक्टरांशी चर्चा करतात. हे या संस्थेन तयार केलेली प्रतिष्ठा आहे. ती यापुढेही वाढली पाहिजे", असं फडणवीस म्हणाले.

हेही वाचा -

  1. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या शक्तिपीठ महामार्गाला अशोक चव्हाणांचा विरोध, नेमकं कारण काय?
  2. "मांसाहारामध्ये प्रसादाचा भाव...", फडणवीसांच्या उपस्थितीत नेमकं काय म्हणाले पिठाधीश? पाहा व्हिडिओ
  3. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाणार दावोस दौऱ्यावर, वर्ल्ड इनॉकॉनिक फोरममध्ये होणार सहभागी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.