ETV Bharat / politics

पालकमंत्र्यांची यादी जाहीर; बीडबाबत मोठा निर्णय, धनंजय मुंडेंना धक्का, वाचा संपूर्ण लिस्ट - MAHARASHTRA GUARDIAN MINISTERS LIST

पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली असून, अजित पवार हे आता दोन जिल्ह्यांचे पालकमंत्री असणार आहेत.

Maharashtra Guardian Ministers
पालकमंत्र्यांची पहिली यादी जाहीर (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 18, 2025, 9:06 PM IST

Updated : Jan 18, 2025, 9:40 PM IST

मुंबई : राज्यात बहुप्रतिक्षित पालकमंत्र्यांची यादी अखेर जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रिपद स्वत:कडे ठेवले असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुण्याबरोबर बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. याश‍िवाय उपमुख्यमंत्री एकनाथ श‍िंदे यांच्याकडेही दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. मुंबई शहर तसेच ठाणे जिल्ह्याचे ते पालकमंत्री असतील. मराठा आरक्षणासाठी झालेल्या आंदोलनाचे केंद्र असलेल्या जालना जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची धुरा पंकजा मुंडे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. तर चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे उपराजधानी नागपूरचे पालकमंत्रिपद देण्यात आले आहे.

Maharashtra Guardian Ministers List
पालकमंत्र्यांची पहिली यादी जाहीर (State Government)

धनंजय मुंडे यांना धक्का : विधिमंडळाच्या नागपूर येथील अध‍िवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला होता. त्यानंतर पालकमंत्री कधी जाहीर होतात, याकडे लक्ष लागलं होतं. मुख्यमंत्री फडणवीस हे दावोसला वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या परिषदेला जाण्यापूर्वी ही यादी जाहीर होईल, अशी अपेक्षा होती. शनिवारी सायंकाळी सरकारतर्फे अधिसूचना काढून पालकमंत्र्यांची नावे जाहीर करण्यात आली. विशेष म्हणजे, धनंजय मुंडे यांच्याकडे कोणत्याही जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आलेली नाही. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे नागपूरसह अमरावती जिल्ह्याचीही जबाबदारी देण्यात आली आहे.

बीड-नांदेडमध्ये मुंडे यांच्या नावांना होता विरोध : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राजकीय वातावरण प्रचंड तापलं आहे. बीड जिल्ह्याचे पालकमंत्रिपद धनंजय मुंडे आण‍ि पंकजा मुंडे यांच्याकडे देऊ नका, तसेच नांदेड जिल्ह्याचेही पालकमंत्रिपद त्यांच्याकडे नको, अशी मागणी करण्यात येत होती. सकल मराठा समाजानेही नांदेडबाबत भूमिका जाहीर करत धनंजय मुंडे आण‍ि पंकजा मुंडे यांना विरोध केला होता. आता बीडची जबाबदार अजित पवार यांच्याकडे देण्यात आली आहे.

रायगडची जबाबदारी तटकरेंकडेच : रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाबाबत जोरदार चर्चा होती. महाड येथील श‍िवसेनेचे आमदार व मंत्री भरत गोगावले यांनी रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी शक्ती पणाला लावली होती. मात्र, रायगडची जबाबदारी महिला व बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे यांनाच देण्यात आली आहे.

मुंबई उपनगर व कोल्हापूरचे पालकमंत्रिपद विभागून : आशिष शेलार व मंगलप्रभात लोढा यांना मुंबई उपनगरचे पालकमंत्रिपद‍ विभागून देण्यात आले आहे. मंगलप्रभात लोढा हे सह-पालकमंत्री असतील. तसेच कोल्हापूर जिल्ह्यात प्रकाश आबिटकर यांना पालकमंत्री तर, माधुरी मिसाळ यांना सह-पालकमंत्री बनविण्यात आले आहे. आशिष जैस्वाल हे गडचिरोलीचे सह-पालकमंत्री असणार आहेत.

पालकमंत्र्यांची संपूर्ण यादी

गडचिरोली – देवेंद्र फडणवीस

नागपूर – चंद्रशेखर बावनकुळे

ठाणे – एकनाथ शिंदे

पुणे – अजित पवार

बीड – अजित पवार

सिंधुदुर्ग- नितेश राणे

अमरावती – चंद्रशेखर बावनकुळे

अहिल्यानगर – राधाकृष्ण विखे पाटील

वाशिम – हसन मुश्रीफ

सांगली – चंद्रकांत पाटील

सातारा -शंभुराजे देसाई

छत्रपती संभाजी नगर – संजय शिरसाट

जळगाव – गुलाबराव पाटील

यवतमाळ – संजय राठोड

कोल्हापूर – प्रकाश आबिटकर, सह पालकमंत्री माधुरी मिसाळ

अकोला – आकाश फुंडकर

भंडारा – संजय सावकारे

बुलढाणा – मकरंद जाधव

चंद्रपूर – अशोक ऊईके

धाराशीव – प्रताप सरनाईक

धुळे – जयकुमार रावल

गोंदिया – बाबासाहेब पाटील

हिंगोली – नरहरी झिरवळ

लातूर – शिवेंद्रसिंग भोसले

मुंबई शहर – एकनाथ शिंदे

मुंबई उपनगर -आशिष शेलार/ सह पालकमंत्री मंगलप्रभात लोढा

नांदेड – अतुल सावे

नंदुरबार – माणिकराव कोकाटे

नाशिक – गिरीष महाजन

पालघर – गणेश नाईक

परभणी – मेघना बोर्डीकर

रायगड – अदिती तटकरे

सिंधुदुर्ग- नितेश राणे

रत्नागिरी – उदय सामंत

सोलापूर – जयकुमार गोरे

वर्धा – पंकज भोयर

जालना – पंकजा मुंडे

हेही वाचा -

  1. धर्म अन् जातीवर मतदान करणे देशाच्या दृष्टीने चुकीचं; ज्येष्ठ काँग्रेस नेते सुशील कुमार शिंदेंचं प्रतिपादन
  2. छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आज मी सी. पी. राधाकृष्णन तुमच्या समोर नसतो, राज्यपालांचं कोल्हापुरात वक्तव्य
  3. सरकार अन् कायदा, सुव्यवस्था मजबूत; देवेंद्र फडणवीस आहेत म्हणून, किरीट सोमय्यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Last Updated : Jan 18, 2025, 9:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.