मुंबई Team India for Champions Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी कर्णधार रोहित शर्मासह 15 खेळाडूंची निवड करण्यात आली. युवा डावखुरा सलामीवीर यशस्वी जयस्वालचा चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पहिल्यांदाच वनडे संघात समावेश करण्यात आला आहे, तर वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी दुखापतीतून बरा झाल्यानंतर बराच काळानंतर वनडे संघात परतला आहे.
HIGHLIGHTS OF TEAM INDIA SQUAD FOR CHAMPIONS TROPHY: 🇮🇳
— Tanuj Singh (@ImTanujSingh) January 18, 2025
- Shubman Gill is Vice Captain.
- Mohammad Siraj dropped.
- Bumrah in the Squad.
- Arshdeep is back.
- No Sanju Samson.
- KL Rahul & Pant are Two WKs.
- Jaiswal in the Squad.
- Jadeja is back in ODIs. pic.twitter.com/mQNFfywvk3
दिग्गज खेळाडूंचं पुनरागमन : विशेष म्हणजे 2023 मध्ये झालेल्या 50 षटकांच्या विश्वचषकानंतर शमी वनडे संघात परतेल. अनुभवी जसप्रीत बुमराहचंही नाव संघात आहे पण त्याची उपस्थिती फिटनेस मिळवण्यावर अवलंबून असेल. ऋषभ पंत आणि केएल राहुल हे संघात दोन यष्टिरक्षक असतील. तथापि, इंग्लंडविरुद्धच्या घरच्या वनडे मालिकेसाठी आणि चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी जाहीर करण्यात आलेल्या 15 सदस्यीय संघात वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला स्थान मिळालेलं नाही. सिराजनं 2023 मध्ये भारतासाठी वनडे विश्वचषक खेळला होता पण 14 महिन्यांनंतर त्याला आयसीसी स्पर्धेच्या संघातून वगळण्यात आलं आहे.
Indian Cricket Team for Champions Trophy: Rohit Sharma (C), Virat Kohli, S Gill (VC), S Iyer, KL Rahul, Hardik Pandya, Axar Patel, Washington Sundar, Kuldeep Yadav, Jasprit Bumrah, M Shami, Arshdeep, Y Jaiswal, R Pant and R Jadeja. pic.twitter.com/GBuEWg82rc
— ANI (@ANI) January 18, 2025
सिराजला संघात स्थान नाही : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मानं मोहम्मद सिराजला संघात न निवडण्यामागील कारण सांगितलं. त्यानं पत्रकार परिषदेत सांगितलं की, "मोहम्मद सिराज तेवढा प्रभावी ठरत नव्हता आणि खेळ जसजसा पुढं सरकतो आणि चेंडू थोडा जुना होत जातो तसतशी त्याची प्रभावीता कमी होत जाते. म्हणूनच वेगवान गोलंदाजाला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे."
वनडे विश्वचषकानंतर संघ खूप बदलला : सिराज हा 2023 चा विश्वचषक खेळलेल्या खेळाडूंपैकी एक आहे पण आता तो टीम इंडियासाठी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहभागी होऊ शकणार नाही. सिराज व्यतिरिक्त, सूर्यकुमार यादव, शार्दुल ठाकूर, प्रसिद्ध कृष्णा, इशान किशन आणि रविचंद्रन अश्विन हे देखील चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या संघाचा भाग नाहीत. रविचंद्रन अश्विननं अलीकडेच निवृत्तीची घोषणा केली, तर उर्वरित खेळाडू खराब फॉर्ममुळं संघात स्थान मिळवू शकले नाही.
India's squad for the #ChampionsTrophy 2025 announced! 💪 💪
— BCCI (@BCCI) January 18, 2025
Drop in a message in the comments below 🔽 to cheer for #TeamIndia pic.twitter.com/eFyXkKSmcO
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 आणि इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ :
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टिरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत (यष्टिरक्षक) आणि रवींद्र जडेजा.
हेही वाचा :