ETV Bharat / state

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते स्वामित्व योजनेला सुरुवात, कसा मिळणार फायदा? - PRIME MINISTER NARENDRA MODI

पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वामित्व योजनेतील पाच लाभार्थ्यांसोबत संवाद साधणार होते, त्यामध्ये नागपूर जिल्ह्याच्या भिवापूर तालुक्यतील रोशन पाटील यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदीनी संवाद साधलाय.

Prime Minister Narendra Modi launches the svamitva scheme
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते स्वामित्व योजनेला सुरुवात (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 18, 2025, 6:21 PM IST

Updated : Jan 18, 2025, 6:36 PM IST

नागपूर- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील 10 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमध्ये स्वामित्व योजनेंतर्गत 65 लाखांपेक्षा अधिक प्रॉपर्टी कार्ड्सचे वितरण करण्यात आलंय. राज्यातील सर्व जिल्ह्यांतून लाभार्थी ऑनलाइन पद्धतीने कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वामित्व योजनेतील पाच लाभार्थ्यांसोबत संवाद साधणार होते, त्यामध्ये नागपूर जिल्ह्याच्या भिवापूर तालुक्यतील रोशन पाटील यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदीनी संवाद साधलाय. नागपूरच्या वसंतराव नाईक सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हेदेखील उपस्थिती होते.

काय म्हणाले पंतप्रधान : स्वामित्व योजनेअंतर्गत देशातील प्रत्येक गावात ड्रोनच्या मदतीने घरांचे आणि जमिनींचे मॅपिंग करण्यात येणार आहे. गावातील सर्व लोकांना त्यांच्या निवासी मालमत्तांची कागदपत्रे देण्यात येणार आहेत. आमचे सरकार संपूर्ण प्रामाणिकपणे ग्राम स्वराज्य प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करीत आहे. स्वामित्व योजनेमुळे गावातील नियोजन आणि अंमलबजावणीत खूप जास्त प्रमाणात सुधारणा होतेय. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रोशन पाटील यांच्याशी संवाद साधताना मराठी बोललेत. रोशन पाटील यांना मोदींनी मराठीतच तुमच्या मुलाचं नाव काय आहे विचारलं, त्यावर रोशन पाटील म्हणाले, माझ्या मुलाचं नाव शर्विल आहे आणि आज त्याचा वाढदिवससुद्धा आहे. त्यानंतर मोदी मराठीतच म्हणाले की, माझेही त्याला आशीर्वाद द्या, मोदींनी मराठीत संवाद साधल्यानं त्यांनी तिथे उपस्थितही अवाक् झाले.

प्रमुख योजनांच्या केंद्रस्थानी महिला : विकसित भारताच्या उभारणीत महिलाशक्तीची खूप मोठी भूमिका आहे, गेल्या दशकात आम्ही माता आणि सुकन्यांच्या सक्षमीकरणास प्रत्येक प्रमुख योजनांच्या केंद्रस्थानी ठेवले आहे. देशातील नागरिकांच्या मालमत्तांना अधिकृत चेहरा देणाऱ्या केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी स्वामित्व योजनेचा शुभारंभ आज महाराष्ट्रात झालाय. राज्यातील ग्रामीण भागात गाव-खेड्यांमध्ये मूळ गावठाणात वाडवडिलोपार्जित जमिनीवर स्थायिक असलेल्यांना आता त्यांच्या जमिनीची मालकी अर्थात स्वामित्व मिळणार आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील 30 जिल्ह्यांतील 30 हजार 515 गावांतील मालमत्ताधारकांना डिजिटल प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे.

शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी जनतेशी आणि स्वामित्व योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला आहे. ग्रामीण भागात शेतकऱ्यांना, गावकऱ्यांना स्वतःच्या मालकीहक्काच्या जमिनींचे पट्टेवाटप सुलभरीत्या होणार आहे. या योजनेमुळे ग्रामीण भागातील मालमत्तांचे ड्रोन आधारित सर्वेक्षण होणार आहे, त्यामुळे आता ग्रामीण भागातील नागरिकांना मालमत्तेचे डिजिटल प्रॉपर्टी कार्ड उपलब्ध होणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे विशेषतः ग्रामीण भागात वडिलोपार्जित मालमत्तेची कागदपत्रे नसल्यामुळे अनेकदा मालमत्तेवर कब्जा केला जातो. यातूनच शेतकऱ्यांची फसवणूक होण्यासारख्या घटना घडतात. शेतकऱ्यांना डिजिटल प्रॉपर्टी कार्ड मिळाल्यामुळे या सर्व गोष्टींना आळा बसू शकतो.

शेतकऱ्यांची आर्थिक पत सुधारणार : महसूलमंत्री : महसूलमंत्री बावनकुळे यांनी योजनेच्या संदर्भात माहिती देताना सांगितले की, ग्रामीण भागातील नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड मिळण्याबरोबरच शेतकऱ्यांची आर्थिक पत सुधारण्यासाठीही या योजनेचा फायदा होणार आहे. प्रॉपर्टी कार्ड मिळाल्याने शेतकऱ्यांना मालमत्ता कर सुलभरीत्या भरता येणार असून, बँकेतून विविध प्रकारची कर्जे मिळविण्यासाठी तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक कल्याणकारी योजनांचा लाभ मिळविण्यासाठी प्रॉपर्टी कार्डची मोठी मदत होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साधला महाराष्ट्रातील रोशन पाटीलशी संवाद (Source- ETV Bharat)

ग्रामपंचायती स्वयंपूर्ण होण्यासाठी मदत होणार : योजनेच्या माध्यमातून ग्रामपंचायती स्वयंपूर्ण होण्यासाठी मदत होणार असल्याचेही महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलंय. या योजनेच्या माध्यमातून गावांतील जमिनीचे योग्य प्रकारे वाटप झाल्याने ग्रामपंचायतींना करआकारणी सुलभरीत्या करता येणार आहे. परिणामी, ग्रामपंचायतींच्या उत्पन्नात वाढ होणार असून, यामुळे ग्रामपंचायत स्वयंपूर्ण होणार आहेत.

हेही वाचाः

SPECIAL REPORT : स्वामित्व योजना आहे तरी काय? प्रॉपर्टी कार्ड कसे मिळणार? शेतकऱ्यांचा होणार फायदा - SVAMITVA SCHEME

Last Updated : Jan 18, 2025, 6:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.