हैदराबाद Mohammed Siraj : टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजचं नाव अलिकडेच भारताच्या दिग्गज गायिका आशा भोसले यांची नात जानाई भोसलेशी जोडलं गेले. दोघांमध्ये नात्याबद्दल अफवा पसरल्या होत्या. पण यानंतर काही दिवसांनीच सिराजनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आणि तिला त्याची बहीण म्हटलं. यानंतर आता असा दावा केला जात आहे की तो बिग बॉस फेम माहिरा शर्माला डेट करत आहे. मात्र, दोघांनीही यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण आता माहिराच्या आईला या गोष्टी कळताच तिच्या पायाखालची जमीन सरकली. या बातम्यांमुळं ती प्रचंड संतापल्याचं पाहायला मिळत आहे.
मोहम्मद सिराज और माहिरा शर्मा को लेकर उठी डेटिंग अफवाहों पर माहिरा की मां सानिया शर्मा ने स्थिति स्पष्ट करते हुए कहा कि यह बुरी तरह से गलत खबर है। pic.twitter.com/3oTN3i0zH7
— Bablu Baghel (@BabluBaghel) January 31, 2025
माहिराच्या आईनं काय म्हटलं : माहिरा शर्माच्या आईला सिराज आणि तिच्या मुलीच्या नात्याबद्दल विचारण्यात आलं. तिला हे ऐकून खूप राग आला. तिनं टाईम्स नाऊशी बोलताना अशा अफवांवर नाराजी व्यक्त केली आणि ही बातमी पूर्णपणे खोटी असल्याचं म्हटलं. ती म्हणाली, "काय म्हणताय? हे बरोबर नाही. माझी मुलगी एक सेलिब्रिटी आहे, म्हणून जर कोणी तिचं नाव कोणाशी जोडलं तर आपण ते खरं मानावं का? ही बातमी पूर्णपणे खोटी आहे." सिराज आणि माहिराच्या डेटिंगच्या अफवांना पहिल्यांदा गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये वेग आला होता. तेव्हा भारतीय क्रिकेटपटूनं माहिराचा फोटो लाईक केला होता. यानंतर दोघांमधील नात्याबद्दल चर्चा सुरु झाल्या.
सिराज सध्या काय करतो : मोहम्मद सिराजचा ऑस्ट्रेलिया दौरा अपेक्षेप्रमाणे नव्हता. यानंतर, तेथून परत येताच त्याला मोठा धक्का बसला. खरंतर, 19 फेब्रुवारीपासून होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी त्याची भारतीय संघात निवड झाली नव्हती. कर्णधार रोहित शर्मानं त्याला नवीन चेंडूचा गोलंदाज म्हणत वगळलं आणि अर्शदीपला जागा दिली. आता सिराज हैदराबादच्या वतीनं देशांतर्गत प्रथम श्रेणी क्रिकेट स्पर्धेत रणजी ट्रॉफीमध्ये भाग घेत आहे. 30 जानेवारी रोजी सुरु झालेल्या विदर्भाविरुद्धच्या सामन्यात सिराजनं 18 षटकं गोलंदाजी केली आणि 1 बळी घेतला.
मोहम्मद सिराज और माहिरा शर्मा को लेकर उठी डेटिंग अफवाहों पर माहिरा की मां सानिया शर्मा ने स्थिति स्पष्ट करते हुए कहा कि यह बुरी तरह से गलत खबर है। pic.twitter.com/3oTN3i0zH7
— Bablu Baghel (@BabluBaghel) January 31, 2025
सिराजची कसून गोलंदाजी : सिराजला जास्त विकेट घेता आल्या नाहीत तरी त्यानं कसून गोलंदाजी केली. त्यानं 18 षटकांत 87 डॉट बॉल टाकले, त्यापैकी 7 षटकं मेडन होती. त्याचा इकॉनॉमी रेट प्रति षटक फक्त 2.61 धावा होता. त्यानं एका टोकापासून दबाव कायम ठेवला, ज्याचा फायदा त्याच्या सहकारी गोलंदाजांना झाला. त्याच्या संघाच्या रक्षन आणि अंकित रेड्डी यांनी प्रत्येकी 3 विकेट घेतल्या, तर मिलिंदनं 2 विकेट घेतल्या. अशाप्रकारे हैदराबादनं विदर्भाला फक्त 190 धावांत गुंडाळलं.
हेही वाचा :