हैदराबाद : दिग्गज स्मार्टफोन कंपनीच्या आयफोन विक्रीत वाढ झालीय. गेल्या वर्षी, भारतात आयफोन आणि आयपॅडची मोठ्या प्रमाणात विक्री झाली आहे. अहवालानुसार, २०२४ मध्ये आयफोनचा भारतीय स्मार्टफोन बाजारपेठेत सुमारे ७ टक्के वाटा होता. यावरून ॲपल कंपनीची भारतात चांगली उलाढाल होत असल्याचं दिसून येत आहे. आयफोनच्या विक्रीचं कारण स्थानिक उत्पादन आणि लहान शहरांमध्ये महागड्या स्मार्टफोनची मागणी असल्याचं मानलं जातं.
आयफोनच्या विक्रीत २३ टक्के वाढ
सायबरमीडिया रिसर्च (सीएमआर) च्या आकडेवारीनुसार, गेल्यावर्षी आयफोन विक्रिमध्ये २३ टक्के वाढ नोंदवली गेली आहे. त्याचवेळी कंपनीच्या आयपॅड विक्रीत ४४ टक्के वाढ झालीय. अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, भारतातील मध्यमवर्गीय लोकसंख्या आता प्रीमियम डिव्हाइस खरेदी करण्यास आग्रणी आहेत. आयफोन आणि आयपॅड विक्रीचा हा ट्रेंड २०२५ मध्येही सुरू राहण्याची अपेक्षा आहे. २०२४ च्या ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत, ॲपलनं भारतातील टॉप ५ स्मार्टफोन प्लेयर्समध्ये स्थान मिळलंय. गेल्या वर्षीच्या तुलनेत, ॲपलनं निर्यात आणि देशांतर्गत विक्रीत विक्रम प्रस्थापित केले आहेत.
ॲपलसाठी भारत का महत्त्वाचा
ॲपलसाठी भारतीय बाजारपेठ महत्त्वाची आहे. कारण, चीननंतर, भारत हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा स्मार्टफोन बाजार आहे. कंपीच्या आयफोनला तरुणांची पसंती असल्यामुळं विक्रीत मोठी वाढ होतेय. दुसरीकडं, जगातील सर्वात मोठा स्मार्टफोन बाजार असलेल्या चीनमध्ये ॲपल आयफोनची विक्रीत घट होताना दिसतेय. चीनमधी आयफोन विक्रीचं मोठं कारण म्हणजे चीनचा स्मार्टफोन हुआवे असल्याचं मानलं जातं. चीनमध्ये आयफोन विक्रीत घट झाल्यामुळे, जागतिक स्तरावर आयफोनची विक्री कमी झाली आहे. अशा परिस्थितीत, ॲपलनं भारतीय स्मार्टफोन बाजारपेठेवर लक्ष केंद्रित केल्याचं दिसून येतंय.
हे वाचलंत का :