नवी दिल्ली- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज शुक्रवारी संसदेत आर्थिक सर्वेक्षण ( economical survey in union budget) अहवाल सादर करणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आर्थिक सर्वेक्षण अहवाल आज दुपारी १२ वाजता सादर केला जाणार आहे.
Live updates
- महाकुंभ मेळाव्यामधील चेंगराचेंगरीची दुर्घटना आणि पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या मृत्यूबाबात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. गरिबांना घरे देण्यासाठी सरकारनं खूप प्रयत्न केले आहेत. २ कोटी २५ लाख लोकांना त्यांच्या जमिनीचे अधिकार दिले आहेत. आयुष्यमान भारत अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य सेवा देण्यात येतात. ५०० खासगी कंपन्यांत रोजगाराच्या संधी दिल्या जात आहेत. पीएम योजनेचा करोडो लोकांना फायदा झाला आहे. एक राष्ट्र, एक निवडणुकीवर काम सुरू आहे. विकसित भारत घडविणं हे सरकारचं लक्ष्य आहे. २५ कोटी जनता दारिद्र्यरेषेच्या बाहेर आली आहे. तिसऱ्या कार्यकाळात तिप्पट वेगानं विकास होत आहे. भारत जगातील सर्वात मोठी तिसरी अर्थव्यवस्था होईल."
#WATCH | #BudgetSession | PM Modi says, " i pray that maa lakshmi continues to bless the poor and middle class of our country. it is a matter of great pride that india completed 75 years as a democratic nation. india has established itself well on the global pedestal...this is the… pic.twitter.com/BF2dT2oTz9
— ANI (@ANI) January 31, 2025
- पंतप्रधान मोदींनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वी महालक्ष्मीला वंदन केलं आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले, "गरीब, मध्यमवर्गीय परिवारावर महालक्ष्मीची कृपा असावी. देशाच्या जनतेनं तिसऱ्यांदा नेतृत्वाचा संधी दिली आहे. उद्या देशाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. अर्थसंकल्पामधून नवीन विश्वास निर्माण होणार आहे. २०४७ मध्ये विकसित देशाचा भारताचा संकल्प आहे. स्वांत्र्याच्या १०० वर्षात भारत विकसित होणार आहे. भारत सध्या मिशन मोडमध्ये आहे. महिला वर्गासाठी अत्यंत आवश्यक निर्णय या अधिवेशनात होणार आहेत. अनेक ऐतिहासिक अधिवेशनावर चर्चा होणार आहे. रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म ही त्रिसुत्री आहे."
Delhi | Addressing a joint sitting of Parliament, President Droupadi Murmu says, " under the ayushman bharat scheme, it has been decided to provide health insurance to six crore senior citizens aged 70 years and above." pic.twitter.com/6VIIHdfgHb
— ANI (@ANI) January 31, 2025
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (president murmu address parliament) आज सकाळी ११ वाजता संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करणार आहेत. त्यांच्या भाषणानंतर, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण लोकसभा आणि राज्यसभेत आर्थिक सर्वेक्षण २०२४-२५ अहवाल स्वतंत्रपणे मांडणार आहेत. आर्थिक सर्वेक्षण अहवाल आज दुपारी सुमारे १२ वाजता लोकसभेत आणि दुपारी २ वाजता राज्यसभेत सादर केला जाणार आहे. हा आर्थिक सर्वेक्षण अहवाल मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंथा नागेश्वरन यांच्या देखरेखीखाली तयार करण्यात आलं आहे. त्यात अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागानं तयार केलेल्या अर्थव्यवस्थेची माहिती आणि सविस्तर आकडेवारी असते.
काय असतो आर्थिक सर्वेक्षण अहवाल?देशाच्या अर्थव्यवस्थेच्या आरोग्याची स्थिती कशी आहे, याची माहिती आर्थिक सर्व्हेक्षणातून दिसून येत असते. या अहवालात सरकारकडून जीडीपी वाढविण्याचं आणि आर्थिक प्रगतीचं उद्दिष्ट निश्चित करण्यासाठी शिफारशी करण्यात येणार आहे. अर्थसंकल्प तयार करण्यात करताना आर्थिक सर्वेक्षण अहवालाच्या आकडेवारीचा आधार घेतला जातो. बऱ्याचदा आर्थिक सर्वेक्षणात वर्षभरातील विविध योजनांच्या अंमलबजावणी आणि आर्थिक प्रगतीची आकडेवारी दिलेली असते. येणाऱ्या आर्थिक वर्षाचा अंदाज हा आर्थिक सर्वेक्षणावरून करण्यात येतो. दरवर्षी, अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक होते. या बैठकीत मंत्र्यांना २०२५ च्या अर्थसंकल्पाबद्दल माहिती दिली जाते. त्यानंतर मंत्रिमंडळाकडून अर्थसंकल्पाला मंजुरी दिली जाते.
दोन टप्प्यांत सादर होणार अर्थसंकल्प- केंद्रीय अर्थसंकल्प २०२५ शनिवार, १ फेब्रुवारी रोजी सादर केला जाईल. यंदा अर्थमंत्री सीतारमण सलग आठव्यांदा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील. यावेळी अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारी ते ४ एप्रिल या कालावधीत दोन टप्प्यात होणार आहे. सत्राचा पहिला भाग १३ फेब्रुवारी रोजी संपेल आणि दुसरा टप्पा १० मार्चपासून सुरू होईल. संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार, २०२५ मध्ये भारतीय अर्थव्यवस्था ६.६ टक्क्यांनी वाढेल, असा अंदाज आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात वित्त विधेयक २०२५, वक्फ आणि बँकिंग नियमन कायद्यातील सुधारणा आणि भारतीय रेल्वे आणि भारतीय रेल्वे बोर्ड कायद्यांचे विलीनीकरण यासह १६ विधेयके अधिवेशनात मांडण्यात येणार आहे.
हेही वाचा-