भरधाव कारचा टायर फुटल्यानं अपघात, पाहा काळजाचा ठोका चुकवणारा सीसीटीव्ही व्हिडिओ - Satara Road Accident
🎬 Watch Now: Feature Video
Published : Jan 20, 2024, 6:58 PM IST
सातारा Satara Road Accident : भरधाव गाडीचा टायर फुटल्यानं चालकाचं कारवरील नियंत्रण सुटलं आणि कारला अपघात झाला. टायर फुटला तसंच, गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या हॉटेलच्या भिंतीला धडकली. आज शनिवार 20 जानेवारी रोजी सातारा-कास मार्गावर दुपारच्या वेळी ही घटना घडली. या घटनेच्या वेळी समोरुन एक दुचाकीस्वार येत होता. त्याच्या गाडीवर पत्नी आणि मुलं होती. सुदैवानं कार रस्त्यातून बाजूला जाऊन हॉटेलच्या संरक्षक भिंतीला धडकल्यानं हे गाडीवरील कुटुंब थोडक्यात बचावलं. या गाडीचा थरारक अपघात सीसीटीव्हीत कैद झाला आहे. हा व्हिडिओ पाहताना काळजाचा ठोका चुकतो. अपघातग्रस्त गाडी आशा भवन गतिमंद शाळेची होती. मात्र, कारमध्ये विद्यार्थी नव्हते, फक्त गाडीत चालक होता. त्यामुळं मोठा अनर्थ टळला. तसंच, चालकानं सीटबेल्ट लावला असल्यामुळं चालकही सुखरुप बचावला.