आरोग्य मित्र संघटना करणार 'काम बंद आंदोलन'; नेमकं कारण काय? - KAAM BAND ANDOLAN
🎬 Watch Now: Feature Video
Published : Jan 6, 2025, 11:39 AM IST
|Updated : Jan 6, 2025, 9:48 PM IST
पुणे : महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना, पंतप्रधान जन आरोग्य योजना यासारख्या शासनाच्या विविध योजनांमध्ये काम करणाऱ्या आरोग्य मित्रांना गेल्या काही वर्षांपासून तुटपुंज्या वेतनात काम करावं लागतंय. त्यांना कोणतीही पगारवाढ दिली जात नाही. आता आरोग्य मित्रांना वेतन वाढ द्या, अन्यथा काम बंद आंदोलन करू, असा इशारा आरोग्य मित्र संघटनांनी दिला आहे. आरोग्य मित्रांच्या विविध मागण्यांचं निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात येणार आहे. त्यानंतरही वेतन वाढ झाली नाही तर काम बंद करणार असल्याचं आरोग्य मित्र संघटनांकडून सांगितलं जातंय. दरम्यान, राज्यात मोठ्या संख्येनं आरोग्य मित्र असून अनेक रुग्णालयात रुग्णांची सेवा देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होत आहे. यामुळं आरोग्य मित्रांच्या वेतनात वाढ व्हावी, तसंच किमान वेतन कायद्यानुसार महागाई भत्ता द्यावा, वेतनात दरवर्षी दहा टक्क्यानं वाढ करावी, अशी मागणी महाराष्ट्र आरोग्य मित्र संघटनेचे उपाध्यक्ष गणेश शिंदे यांनी केली आहे.