मुंबई : 'गेम चेंजर'च्या नुकत्याच झालेल्या प्रमोशनल कार्यक्रमात चाहत्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. या कार्यक्रमानंतर एक अशी घटना घडली, ज्यामुळे साऊथ अभिनेता राम चरण अस्वस्थ झाला. 'गेम चेंजर'च्या प्रमोशनल कार्यक्रमात उपस्थित असणाऱ्या दोन चाहत्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर निर्मात्यांनी 10 लाख रुपयांची देणगी देण्याची घोषणा केली आहे. राम चरणचा बहुप्रतीक्षित चित्रपट 'गेम चेंजर'चा प्री-रिलीज कार्यक्रम शोकांतिकेत बदलला, जेव्हा दोन चाहते घरी परतत असताना रस्ता अपघाताचे शिकार झाले.
दोन चाहत्यांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला : हा कार्यक्रम 4 डिसेंबर रोजी राजमुंदरी येथे घडला. कार्यक्रम आटोपून घरी परतत असताना, काकीनाडा जिल्ह्यातील रहिवासी अरवा मणिकांठा (23) आणि थोकदा चरण (22) हे दोघे दुचाकीवरून जात असताना रात्री साडेनऊच्या सुमारास वडिसालेरूजवळ त्यांना व्हॅननं धडक दिली. यानंतर या दोघांना पेड्डापुरम रुग्णालयात दाखल करण्यात आलं. इथे त्यांची मृत्यू झाल्याचं घोषित करण्यात आलं. ही बातमी समोर आल्यानंतर या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना चित्रपट निर्माते दिल राजू यांनी शोक व्यक्त केला आहे.
ఏడీబీ రోడ్డుపై ప్రమాదంలో యువకుల మృతి బాధాకరం
— Pawan Kalyan (@PawanKalyan) January 6, 2025
కాకినాడ – రాజమహేంద్రవరం నగరాల మధ్య ఉన్న ఏడీబీ రోడ్డు ఛిద్రమైపోయింది. గత అయిదేళ్ళల్లో ఈ రోడ్డు గురించి పట్టించుకోలేదు. పాడైపోయిన ఈ రోడ్డును బాగు చేస్తున్నారు. ఈ దశలో ఏడీబీ రోడ్డుపై చోటు చేసుకున్నా ప్రమాదంలో ఇద్దరు యువకులు దుర్మరణం…
Our heartfelt condolences go out to the loved ones of Shri. Manikanta and Shri. Charan during these challenging times. 🙏🏼
— Game Changer (@GameChangerOffl) January 6, 2025
Producer Dil Raju Garu has pledged ₹10 lakhs and assured his support to the families of the two individuals who tragically lost their lives in the accident…
'गेम चेंजर'च्या प्रमोशनल कार्यक्रम बदलला शोकात : निर्माते दिल राजू यांनी याप्रकरणी म्हटलं, "मला नुकतेच कळले की, कार्यक्रमानंतर परतत असताना दोन चाहत्यांचा दुःखद मृत्यू झाला. म्हणूनच पवन कल्याण यांनी मला विचारले की, या कार्यक्रमाशिवाय दुसरा पर्याय आहे का? त्यांनी पुढं म्हटलं की, एवढ्या मोठ्या घटनेनंतर काहीतरी दुःखद घडते, हे चांगले नसते. पण, राम चरण आणि मी त्यांना या कार्यक्रमासाठी विनंती केली. या चाहत्यांच्या आत्म्याला शांती लाभो आणि आम्ही दोघेही त्याच्या कुटुंबांच्या पाठीशी उभे राहून त्यांना पाठिंबा देऊ. या दोघांनाही मी तातडीनं 5-5 लाख रुपये पाठवत असून आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहू, अशी ग्वाही आम्ही देतो."
पवन कल्याण आणि राम चरणनं केली मदत : पवन कल्याण आणि राम चरण यांनीही प्रत्येक कुटुंबाला 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. 'गेम चेंजर'च्या प्रमोशनल कार्यक्रमात राम चरण आणि उपमुख्यमंत्री पवन कल्याण देखील सहभागी झाले होते. या कार्यक्रमाला पाहण्यासाठी चाहत्यांची प्रचंड गर्दी जमली होती. 'गेम चेंजर' चित्रपटात राम चरण व्यतिरिक्त कियारा अडवाणी आणि एसजे सूर्या कलाकार आहेत. हा चित्रपट 10 जानेवारीला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा :