लखनऊ : उत्तर प्रदेशातील पिलीभीत इथं पोलीस आणि खलिस्तानवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली. या चकमकीत तीन खलिस्तानवाद्यांना ठार करण्यात पोलिसांना यश आलंय. मात्र या चकमकीनंतर खलिस्तानवादी गुरपतवंत सिंह पन्नू यानं पुन्हा एकदा महाकुंभ 2025 बाबत धमकी दिली आहे. त्यानं एक व्हिडिओ जारी करुन समर्थकांनी 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी दरम्यान लखनऊ आणि प्रयागराज विमानतळावर येण्याचं आवाहन केलं. या आवाहनाचा ई-मेल त्यानं समर्थकांना पाठवला. त्यानं आपल्या मोहिमेला महाकुंभ महायुद्ध असं नाव दिल्यानं मोठी खळबळ उडाली आहे.
खलिस्तानी समर्थकांना ई मेल करुन केलं आवाहन : सोमवारी गुरपतवंत सिंह पन्नू याच्या नावानं अनेकांना ई-मेल करण्यात आले. या ई मेलमध्ये 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारीपर्यंत खलिस्तानी समर्थकांनी लखनऊ आणि प्रयागराज विमानतळावर पोहोचावं. तिथं खलिस्तान आणि काश्मीरचा झेंडा फडकावा. 'ना हिंदुत्व ना हिंदुस्थान, महाकुंभ प्रयागराज रणांगण बनला आहे', असं त्यानं या ई-मेलमध्ये नमूद केलं आहे.
तीन साथीदारांच्या मृत्यूचा घेणार बदला : पंजाब पोलिसांनी डिसेंबर 2024 मध्ये यूपी एसटीएफच्या मदतीनं पीलीभीतमध्ये चकमकीत तीन खलिस्तानवाद्यांना कंठस्नान घातंल. यात वीरेंद्र सिंग, गुरविंदर सिंग आणि जसनप्रीत सिंग यांना ठार करण्यात आलं. त्यानंतर खलिस्तानवाद्यांनी आणि शीख फॉर जस्टिस (SFJ) प्रमुख गुरपतवंत सिंह पन्नू यानं कुंभमेळ्याच्या तीनही शाही स्नानावर दहशतवादी कारवाया करण्याची धमकी दिली. आपल्या तीन साथीदारांच्या मृत्यूचा बदला घेऊन हा महाकुंभ शेवटचा कुंभ बनवणार असल्याची धमकी त्यानं दिली. यानंतर पोलिसांनी सर्व आंतरराष्ट्रीय सीमेवर सतर्कता वाढवली असून कुंभमेळ्याची सुरक्षा मजबूत केली.
हेही वाचा :
- पिलीभीतमध्ये चकमकीत 3 खलिस्तानवादी ठार; यूपी एसटीएफ अन् पंजाब पोलिसांची संयुक्त कारवाई
- Rail Roko Movement In Punjab : पंजाबमधील रेल रोको आंदोलनात खलिस्तानवाद्यांच्या सहभागाची शक्यता; रेल्वेसह गुप्तचर विभाग सतर्क
- Khalistani Shelter in Nanded : 'एनआयए'कडून गँगस्टर्सची यादी जाहीर; नांदेडात आश्रय घेण्याची शक्यता, पोलीस सतर्क