हरारे ZIM vs IRE 1st T20I Live Streaming : झिम्बाब्वे राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि आयर्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात तीन सामन्यांची T20 मालिका सुरु होत आहे. यातील पहिला सामना आज 22 फेब्रुवारी 2025 रोजी हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे इथं खेळवला जाईल.
We're back again at Harare Sports Club this Saturday as Zimbabwe and Ireland battle it out in the first T20I. 🔥
— Zimbabwe Cricket (@ZimCricketv) February 21, 2025
The match starts at 13:30 local time.#ZIMvIRE #Travel&ExperienceZimbabwe pic.twitter.com/mjm8RI61vJ
पाहुण्या संघाचा पुनरागमनाचा प्रयत्न : या मालिकपुर्वी दोन्ही संघांमध्ये एक कसोटी सामना खेळवण्यात आला होता. ज्यात आयर्लंडनं विजय मिळवला आहे. यानंतर दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवण्यात आली. ज्यात यजमान संघानं जबरदस्त पुनरागमन केलं आणि 2-1 नं मालिका विजय मिळवला. आता दोन्ही संघ T20 मालिकेत एकमेकांसमोर येतील. झिम्बाब्वे संघ मालिकेतील पहिला सामना जिंकून आघाडी मिळवू इच्छितो. तर आयर्लंड संघ T20 मालिकेत पुनरागमन करु इच्छितो. आयर्लंडचा संघ संतुलित आहे.
A thumping nine-wicket victory for Zimbabwe as they clinch the ODI series against Ireland in style! 💪#ZIMvIRE #Travel&ExperienceZimbabwe 📝: https://t.co/3RxkcUg8zK pic.twitter.com/n9qpA1m3DP
— Zimbabwe Cricket (@ZimCricketv) February 18, 2025
हरारेची खेळपट्टी कशी असेल : हरारे स्पोर्ट्स क्लब मैदानावर अलिकडेच चांगले सामने खेळले गेले आहेत. या मैदानाची खेळपट्टी चढ-उतार होते. सुरुवातीला, नवीन चेंडूनं वेगवान गोलंदाज घातक ठरले आहेत. पण असे फलंदाज आहेत जे स्थिरावल्यानंतर मोठी खेळी करु शकतात. खेळपट्टी थोडी मंद आहे, ज्यामुळं चेंडू अधिक फिरतो. अशा परिस्थितीत, नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करत विरोधी संघाला कमी धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करेल.
That's it - well done to Zimbabwe, too good today.
— Cricket Ireland (@cricketireland) February 18, 2025
▪️Ireland 240-6 (50 overs)
▪️Zimbabwe 246-1 (39.3 overs)
SCORECARD: https://t.co/IajZ3zeJfM#BackingGreen @FailteSolar ☘️🏏 pic.twitter.com/Ju2zIRnjHL
हेड-टू-हेड रेकॉर्ड कसा : झिम्बाब्वे आणि आयर्लंड संघ T20I मध्ये 15 वेळा आमनेसामने आले आहेत. ज्यात आयर्लंडचा वरचष्मा दिसतो. आयर्लंडनं 15 पैकी 8 सामने जिंकले आहेत. तर झिम्बाब्वेनं 7 सामने जिंकले आहेत. यावरुन दोन्ही संघांमध्ये तीव्र स्पर्धा असल्याचं दिसून येते. पण झिम्बाब्वेला घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा मिळू शकतो.
TEAM UPDATE 📡
— Cricket Ireland (@cricketireland) February 20, 2025
Craig Young to stay on in Zimbabwe with T20I squad as injury replacement for Mark Adair. The series starts on Saturday.
Story 🔗 https://t.co/llii8anikm#BackingGreen @FailteSolar ☘️🏏 pic.twitter.com/mnbie4e6aX
झिम्बाब्वे विरुद्ध आयर्लंड यांच्यातील पहिला T20I सामना कधी आणि कुठं खेळवला जाईल?
झिम्बाब्वे विरुद्ध आयर्लंड यांच्यातील पहिला T20I सामना 22 फेब्रुवारी (शनिवार) रोजी हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे इथं भारतीय वेळेनुसार सायंकाळी 5:00 वाजता खेळला जाईल. याची नाणेफेक दुपारी 04:30 वाजता होईल.
That's a wrap of the ODI series - we move on to the T20I series, starting on Saturday.#BackingGreen @FailteSolar ☘️🏏 pic.twitter.com/FxBfxpB4L0
— Cricket Ireland (@cricketireland) February 18, 2025
झिम्बाब्वे विरुद्ध आयर्लंड यांच्यातील पहिला T20I सामना कुठं आणि कसा पाहायचा?
झिम्बाब्वे आणि आयर्लंड यांच्यातील द्विपक्षीय मालिका भारतातील कोणत्याही टीव्ही चॅनेलवर प्रसारित केली जाणार नाही. मात्र आयर्लंड विरुद्ध झिम्बाब्वे पहिला T20I सामना फॅनकोड अॅप आणि वेबसाइटवर लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे पाहता येईल.
सामन्यासाठी दोन्ही संघ :
झिम्बाब्वे : क्रेग एर्विन (कर्णधार), ब्रायन बेनेट, जॉनाथन कॅम्पबेल, बेन करन, ट्रेवर ग्वांडू, वेस्ली माधेवरे, टिनोटेंडा मापोसा, तादिवानाशे मारुमानी, वेलिंग्टन मसाकाड्झा, न्याशा मायावो, ब्लेसिंग मुझाराबानी, रिचर्ड नगारावा, न्यूमन न्यामुरी, सिकंदर रझा, शॉन विल्यम्स.
आयर्लंड : पॉल स्टर्लिंग (कर्णधार), मार्क अडायर, अँड्र्यू बालबर्नी, कर्टिस कॅम्फर, जॉर्ज डॉकरेल, गॅव्हिन होई, ग्राहम ह्यूम, मॅथ्यू हम्फ्रीज, जोश लिटिल, अँड्र्यू मॅकब्राइन, बॅरी मॅकार्थी, हॅरी टेक्टर, मॉर्गन टॉपिंग, लॉर्कन टकर, क्रेग यंग.
हेही वाचा :