ETV Bharat / state

अल्पवयीन मुलीबरोबरच्या संबंधातील आरोपीला न्यायालयानं दिला जामीन; प्रेम संबंधाकडं वेधलं लक्ष - BOMBAY HIGH COURT

अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या आरोपीला मुंबई उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला. या प्रकरणात आरोपीला पाच वर्षानंतर जामीन मिळाला.

BOMBAY HIGH COURT
मुंबई उच्च न्यायालय (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 22, 2025, 8:01 PM IST

मुंबई : अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा आरोप असलेल्या व्यक्तीला अखेर मुंबई उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणात आरोपीला पाच वर्षानंतर जामीन मिळाला आहे. या प्रकरणात न्यायालयानं नोंदवलेलं निरीक्षण अत्यंत परखड आहे. पीडित मुलीला आपण काय करतोय याबाबत पुरेशी माहिती असल्याचे आणि तिचे आरोपीसोबत सहमतीचे संबंध असल्याचं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं आहे. पोक्सो कायदाचा तारतम्यानं वापर झाला पाहिजे असंही यातून सुचित करण्यात आलं आहे. त्यामुळं मुंबई उच्च न्यायालयानं आरोपीला जामीन मंजूर केला. आरोपी गेल्या पाच वर्षापासून तुरुंगात आहे. पंधरा हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर त्याला जामीन दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांनी आरोपीचा जामीन मंजूर केला. या प्रकरणातील आरोपी विरोधात अपहरण आणि बलात्कार केल्याचा आरोप आहे.

काय आहे नक्की प्रकरण : २०१९ साली पीडित अल्पवयीन मुलगी अंधेरीत राहणाऱ्या विवाहित बहिणीला भेटायला जाते, असं सांगून घरातून बाहेर पडली. ही मुलगी चार दिवसानंतर तिच्या वडिलांना जुहू चौपाटीवर एका १९ वर्षीय मुलासोबत फिरताना दिसली. मधल्या चार दिवसाच्या कालावधीत मुलीसोबत पालकांचा संपर्क झाला नव्हता. मुलगी सापडल्यानंतर मुलीच्या वडिलांनी संबंधित तरुणाविरोधात अपहरण आणि बलात्काराचा गुन्हा दाखल केला. मुलगी अल्पवयीन असल्यानं पोक्सो कायद्यानुसार त्या तरुणावर गुन्हा दाखल झाला. या प्रकरणी न्यायालयात खटला दाखल करण्यात आला. त्यावर पाच वर्षांनी आरोपीच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. या दरम्यान न्यायालयानं पीडित मुलीच्या जबाबामध्ये आणि तिच्या वडिलांच्या जबाबामध्ये मोठा फरक असल्याचं निदर्शनास आणलं. मुलीनं तिच्या जबाबमध्ये सदर आरोपी मुलासोबत दोन वर्षापासून प्रेम संबंध असल्याचं मान्य केलं आणि परस्पर सहमतीनं संबंध असल्याचं मान्य केलं. या प्रकरणात पीडित मुलीनं स्वतःच्या आई-वडिलांना कोणतीही माहिती किंवा पूर्वसूचना न देता स्वतःच्या मर्जीनं घर सोडून चार दिवस आरोपीसोबत घालवण्याचं मान्य केलं, याकडं न्यायमूर्तींनी लक्ष वेधलं.

मुलगीचे वडील आणि आरोपी मुलगा एकाच ठिकाणी कामाला : या प्रकरणातील पीडित मुलगी अल्पवयीन असली तरीही या एकूण प्रकरणात तिला आपण जे काही करत आहोत आणि त्याचे काय परिणाम होऊ शकतात या सगळ्याविषयी पुरेशी माहिती होती. या प्रकरणात मुलीला माहिती असतानाही तिनं घरातील सदस्यांना माहिती दिली नाही. कोणतीही माहिती घरच्यांना न देता ती स्वमर्जीनं घराबाहेर पडली आणि चार दिवस आरोपी सोबत राहिली. मुलीचे वडील ज्या हॉटेलमध्ये काम करतात त्याच हॉटेलमध्ये आरोपी मुलगा काम करतो. यामुळं सदर मुलगी त्या मुलाला ओळखत असल्याचं तिनं मान्य केलं. विशेष म्हणजे या हॉटेल मालकानं आरोपीला त्याच्या तरुणी सोबतच्या संबंधांबद्दल इशारा दिला होता. या प्रकरणात गुन्हा नोंदवल्यानंतर आरोपी 2019 पासून आत्तापर्यंत तुरुंगात आहे.

पाच वर्षांपासून आरोपी तुरूंगात : पीडित मुलगी 19 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर 2019 या कालावधीत घरात नव्हती. या प्रकरणी आरोपी मुलाला 25 नोव्हेंबरला अटक केली होती. तेव्हापासून पाच वर्ष दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी तो तुरुंगातच आहे. या प्रकरणातील आरोपी मुलाची गुन्हेगारी पार्श्वभूमीची नोंद नसल्याकडं न्यायालयानं लक्ष वेधलं. जामीन देताना न्यायालयानं आरोपीवर काही अटी लादल्या आहेत. त्यामध्ये वैयक्तिक बॉड देणं, खटल्याच्या सुनावणीला सहकार्य करणं, न्यायालयातील खटल्याच्या तारखांना हजर राहणं, साक्षीदारांना धमकी न देण्याचं तसंच न्यायालयाच्या परवानगीशिवाय राज्याबाहेर जाऊ नये, या अटींचा समावेश आहे.

हेही वाचा :

  1. वेणूताईंची जन्मशताब्दी : साताऱ्यात महिलांसाठी वर्षभर भरगच्च कार्यक्रम, शरद पवारांच्या हस्ते होणार समारोप
  2. शाळेभोवती खोदली चक्क तीन फूट खंदक, कॉपी मुक्त परीक्षा अभियान राबवण्यासाठी नवी शक्कल
  3. मनोज जरांगेंच्या ताफ्यातील गाडीची दुचाकीला धडक : तरुणांकडून महिलेला घरात घुसून मारहाण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.