दुबई PAK vs IND 5th Match Live Streaming : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा पाचवा सामना आज 23 फेब्रुवारी रोजी भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात खेळला जाईल. हा ग्रुप अ चा तिसरा सामना आहे. दोन्ही संघांमधील हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 2:30 वाजता दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाईल. क्रिकेट जगातातील हा सर्वात मोठा सामना मानला जातो.
For his magnificent unbeaten 1️⃣0️⃣1️⃣, Shubman Gill is the Player of the Match 👏🏆#TeamIndia win #BANvIND and register 2 points 👌
— BCCI (@BCCI) February 20, 2025
Scorecard ▶️ https://t.co/ggnxmdG0VK#ChampionsTrophy | @ShubmanGill pic.twitter.com/ID5C8S2z1U
दोन्ही संघांचा दुसरा सामना : चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दोन्ही संघांचा हा दुसरा सामना असेल. या स्पर्धेत टीम इंडियाचं नेतृत्व रोहित शर्मा करत आहे. तर, पाकिस्तानची कमान मोहम्मद रिझवानच्या खांद्यावर आहे. हा सामना केवळ पॉइंट्स टेबलसाठी नाही तर अभिमान आणि सन्मानासाठी देखील महत्त्वाचा असेल. पहिल्या सामन्यात टीम इंडियानं बांगलादेशला 6 विकेट्सनं हरवून चांगली सुरुवात केली, तर पाकिस्तानला न्यूझीलंडविरुद्ध 60 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. गेल्या काही वर्षांत टीम इंडियानं पाकिस्तानविरुद्ध सातत्यानं चांगली कामगिरी केली आहे. हा सामना जिंकत भारतीय संघ उपांत्य फेरीत आपलं स्थान निश्चित करण्याचा प्रयत्न करेल तर पाकिस्तानसाठी हा सामना करो या मरोचा असेल.
🎥 Action from the nets in Dubai 🏏
— Pakistan Cricket (@TheRealPCB) February 21, 2025
📺 WATCH 👉 https://t.co/K2VH3pqfNd#ChampionsTrophy | #PAKvIND | #WeHaveWeWill pic.twitter.com/GTaycLCJW1
हेड-टू-हेड रेकॉर्ड कसा : आतापर्यंत टीम इंडिया आणि पाकिस्तानमध्ये 135 सामने खेळले गेले आहेत, जे इतर कोणत्याही क्रिकेट फॉरमॅटच्या तुलनेत सर्वाधिक आहे. टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील वनडे सामन्यांच्या रेकॉर्डबद्दल बोलायचं झालं तर, पाकिस्ताननं आतापर्यंत 73 सामने जिंकले आहेत, तर टीम इंडियानं 57 सामने जिंकले आहेत. याशिवाय, 5 सामन्यांचा निकाल लागलेला नाही.
A big blow for Pakistan's #ChampionsTrophy defence with Fakhar Zaman ruled out for the remainder of the tournament 😲https://t.co/MdFcGzovEu
— ICC (@ICC) February 21, 2025
दुबईत भारताचं वर्चस्व : टीम इंडियानं दुबईच्या मैदानावर पाकिस्तानविरुद्ध 2 सामने खेळले आहेत. यात टीम इंडियानं दोन्ही सामन्यांमध्ये पाकिस्तानला पराभूत केलं आहे. आता टीम इंडिया 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये या मैदानावर खेळण्यासाठी सज्ज आहे. तसंच आयसीसी स्पर्धेत आतापर्यंत दोन्ही संघांमध्ये एकूण 13 वनडे सामने खेळले गेले आहेत. यात, टीम इंडियानं वरचढ कामगिरी केली आहे. टीम इंडियानं 13 पैकी 10 सामने जिंकले आहेत. तर, पाकिस्तान संघाला फक्त तीन सामने जिंकता आले आहेत. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडिया आणि पाकिस्तानमध्ये आतापर्यंत एकूण पाच वनडे सामने खेळले गेले आहेत. यात पाकिस्तान संघानं वरचढ कामगिरी केली आहे. पाकिस्ताननं पाच पैकी तीन सामने जिंकले आहेत. तर, टीम इंडियाला फक्त दोन सामने जिंकता आले आहेत.
A topsy-turvy game that was high on entertainment and twists 📈#ChampionsTrophy #BANvIND ✍️: https://t.co/HGuD75298k pic.twitter.com/PR4c0cwSnA
— ICC (@ICC) February 20, 2025
दुबईची खेळपट्टी कशी असेल : भारत विरुद्ध बांगलादेश आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या सामन्यादरम्यान दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममधील खेळपट्टी गोलंदाज आणि फलंदाज दोघांनाही मदत करेल अशी अपेक्षा आहे. सुरुवातीला, नवीन खेळपट्ट्यांचा वापर केला जाणार असल्यानं परिस्थिती वेगवान गोलंदाजांना अनुकूल असेल. मात्र सामना पुढं सरकत असताना फलंदाज धावा काढू शकतात. पण फिरकीपटूंना खेळपट्टीवरुनही मदत मिळू शकते.
भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफीचा पाचवा सामना कधी आणि कुठं खेळवला जाईल?
भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफीचा पाचवा सामना 23 फेब्रुवारी (रविवार) रोजी दुबई येथील दुबई स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार दुपारी 2:30 वाजता खेळवला जाईल. ज्याची नाणेफेक दुपारी 02:00 वाजता होईल.
Practice under lights 🏏
— Pakistan Cricket (@TheRealPCB) February 21, 2025
Gearing up for Game No. 2️⃣#ChampionsTrophy | #PAKvIND | #WeHaveWeWill pic.twitter.com/VM2og8G0jr
भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफीचा पाचवा सामना कुठं आणि कसा पहावा?
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे भारतात अधिकृत प्रसारण हक्क जिओस्टार नेटवर्ककडे आहेत. चाहते स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर विविध प्रादेशिक भाषांमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याचं थेट प्रक्षेपण पाहू शकतात. याशिवाय, डिजिटल स्ट्रीमिंगचे अधिकार देखील जिओस्टार नेटवर्ककडे आहेत आणि सामन्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग जिओहॉटस्टार अॅप आणि वेबसाइटवर फ्रीमध्ये उपलब्ध असेल.
सामन्यासाठी दोन्ही संघ :
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टिरक्षक), ऋषभ पंत (यष्टिरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, रवींद्र जडेजा, वरुण चक्रवर्ती.
पाकिस्तान : फखर जमान, बाबर आझम, सौद शकील, मोहम्मद रिजवान (यष्टीरक्षक/कर्णधार), सलमान आघा, तैयब ताहिर, खुशदिल शाह, शाहीन आफ्रिदी, मोहम्मद हसनैन, नसीम शाह, अबरार अहमद
हेही वाचा :