ETV Bharat / state

मंत्रिपदावरून महायुतीत नाराजी असतानाही आता पालकमंत्रिपदावरूनही रस्सीखेच, कोणाला हवे पालकमंत्रिपद? - MAHAYUTI GUARDIAN MINISTER

पालकमंत्रिपदाचा तिढा कसा सोडवायचा किंवा या आव्हानाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन उपमुख्यमंत्री कसे सामोरे जाणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

tug of war in the Grand Alliance even over the post of Guardian Minister
पालकमंत्रिपदावरूनही महायुतीत रस्सीखेच (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 6, 2025, 5:27 PM IST

मुंबई - विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुत मिळाल्यानंतर आता मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांबरोबर इतर आमदारांचा शपथविधी, त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार, खातेवाटप आणि मंत्र्यांना बंगले वाटप झालंय. परंतु अद्यापही पालकमंत्रिपदावरून महायुतीत जोरदार रस्सीखेच सुरू आहे. नागपूरमधील हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मंत्रिमंडळ विस्तार आणि शपथविधी सोहळा पार पडला. त्यानंतर खातेवाटपही झाले. मात्र त्यातील अनेक मंत्र्यांनी अद्यापपर्यंत आपल्या खात्याचा पदभार स्वीकारलेला नाही. दरम्यान, मनाजोगे खाते न मिळाल्यामुळं महायुतीतील अनेक मंत्री नाराज असल्याची चर्चा आहे. महायुतीत एकीकडे मंत्रिपदावरून नाराजी असताना आता दुसरीकडे पालकमंत्रिपदावरूनदेखील महायुतीत रस्सीखेच असल्याचं चित्र आहे. त्यामुळे पालकमंत्रिपदाचा तिढा कसा सोडवायचा किंवा या आव्हानाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन उपमुख्यमंत्री कसे सामोरे जाणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

पालकमंत्रिपदासाठी मंत्र्यांची मोर्चेबांधणी : दरम्यान, राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये त्या जिल्ह्याचे आपणालाच पालकमंत्रिपद मिळावे, अशी मंत्र्यांनी इच्छा व्यक्त केलीय. आपला नेता जिल्ह्याचा पालकमंत्री व्हावा, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. या पालकमंत्रिपदासाठी काही मंत्र्यांनी मोर्चेबांधणीला आतापासूनच सुरुवात केलीय. यामध्ये कोकणातील रायगड जिल्ह्यात मंत्री अदिती तटकरे आणि भरतशेठ गोगावले हे दोघेही जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदासाठी इच्छुक आहेत. आपण या जिल्ह्यात अनेक वेळा आमदार म्हणून निवडून आल्यामुळं आपल्याला पालकमंत्रिपद मिळाले पाहिजे, असं मंत्री भरत गोगावलेंनी बोलून दाखवलंय. तर येथे पालकमंत्रिपदासाठी मंत्री अदिती तटकरेदेखील इच्छुक आहेत. त्यामुळं पालकमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते, याकडे सर्वांचे लक्ष लागलंय.

कोल्हापूरच्या पालकमंत्रिपदावरून रस्सीखेच : दुसरीकडे कोल्हापूरमध्ये पहिल्यांदाच मंत्रिपद मिळालेले शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तथा मंत्री हसन मुश्रीफ यांच्यात पालकमंत्रिपदावरून रस्सीखेच सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्रिपद हे आमच्या साहेबांना मिळावे, अशी भावना कार्यकर्त्यांची आहे. तर प्रकाश आबिटकर यांनी पालकमंत्रिपदासाठी पक्षांच्या वरिष्ठांकडे मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय. महायुतीत पालकमंत्रिपदावरून हीच परिस्थिती कोकणासह राज्यातील अनेक जिल्ह्यात सारखीच आहे. त्यामुळं ज्या इच्छुकांनी पालकमंत्रिपदासाठी फिल्डिंग लावली आहे. त्यांच्या गळ्यात पालकमंत्रिपदाची माळ पडणार की नाही? हे येणाऱ्या काही दिवसातच कळेल.

बीड जिल्ह्याचे पालकमंत्रिपद कोणाकडे? : बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या करण्यात आल्यानंतर तेथील वातावरण तापले आहे. त्यामुळे "बीडचे पालकमंत्री हे धनंजय मुंडे किंवा पंकजा मुंडे यांना न करता, स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्री व्हावे तरच बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत होईल. आणि तिथल्या गुन्हेगारीला आळा बसेल", असं भाजपा आमदार सुरेश धस यांनी म्हटलंय. त्यामुळे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे जाण्याची शक्यता कमीच आहे. सरकार आल्यानंतर सुरुवातीला महायुतीत कुणाला किती मंत्रिपदं द्यायची? कोणती खाती द्यायची? यावरून महायुतीत एकमत होत नव्हतं. परिणामी मंत्रिमंडळ विस्तार आणि शपथविधीला विलंब झाला. यानंतर खातेवाटप आणि मंत्र्यांना देण्यात आलेले बंगले आणि दालनं यावरूनही महायुतीतील मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली असताना आता दुसरीकडे पालकमंत्रिपदावरून महायुतीत रस्सीखेच सुरू आहे. तथापि हे सर्व पाहता पालकमंत्रिपदाचा तिढा कसा सोडवायचा? हे आव्हान सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आहे. तसेच बीड जिल्हा सध्या धगधगत असताना बीडचे पालकमंत्रिपद कोणाकडे जाणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलंय.

एकटे मुख्यमंत्रीच काम करतात : सध्या महायुतीत पालकमंत्रिपदावरून आलबेल नसल्याचं दिसून येत आहे. यावरून विरोधकांनी महायुतीवर टीकास्त्र डागलंय. महायुतीत सुरुवातीला विधानसभा निवडणुकीत तिकीट वाटपावरून वाद चव्हाट्यावर आला होता. यानंतरही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची नावं निश्चित होत नव्हती. परिणामी शपथविधीला विलंब झाला. यानंतर मंत्रिमंडळ विस्तार, खातेवाटप आणि मंत्र्यांना बंगले यावरून मंत्र्यांमध्ये धुसफूस आहे. असं असताना आता पालकमंत्रिपदावरून महायुती रस्सीखेच सुरू आहे. महायुतीतील नेते हे सतत पदासाठीच भांडत आहेत. मग हे काम कधी करणार? महायुतीत एकटे देवेंद्र फडणवीसच काम करताना दिसताहेत, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी पालकमंत्रिपदावरून महायुतीवर केली आहे.

...तर पालकमंत्रिपदाचा तिढा कधीही सुटू शकतो : महायुतीत कोणताही समन्वय नाही, केवळ पदासाठी यांच्यात वाद आणि भांडण सुरू आहेत. म्हणून वारंवार यांच्यातील वाद चव्हाट्यावर येत असल्याची टीका खासदार संजय राऊत यांनी महायुतीवर केली आहे. "सध्या महायुतीत पालकमंत्रीपदावरून जो वाद सुरू आहे. तो वाद भाजपालाच हवा आहे. कारण भाजपाला आता स्पष्ट बहुमत मिळाले आहे. भाजपाला सोबत कोणी आले नाही तरी त्यांच्याकडे जवळपास स्पष्ट बहुमताचा आकडा आहे. त्यामुळं सध्या जो वाद सुरू आहे. त्याच्याकडे भाजप दुर्लक्ष करीत आहे. शेवटी पालकमंत्रिपदाचा तिढा देवेंद्र फडणवीस हे कधीही सोडवू शकतात. देवेंद्र फडणवीसांच्या जर मनात आले आणि त्याला आरएसएसची मान्यता मिळाली तर पालकमंत्रिपदाचा तिढी कधीही सुटू शकतो, असं राजकीय विश्लेषक जयंत माईणकर यांनी "ईटीव्ही भारत"शी बोलताना म्हटलं आहे.

हेही वाचा-

  1. संतोष देशमुख हत्याकांड : सुरेश धस यांचा मंत्री धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, म्हणाले, 'आका वापरायचा 17 मोबाईल फोन'
  2. मनोज जरांगेंची चिथावणीखोर भाषा; ओबीसी नेते आक्रमक, लक्ष्मण हाकेंनी दिला 'हा' इशारा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.