संतोष देशमुख हत्येप्रकरणी पुण्यात सकल मराठा समाजाचा जनआक्रोश मोर्चा; पाहा व्हिडिओ - PUNE PROTEST
🎬 Watch Now: Feature Video


Published : Jan 5, 2025, 1:01 PM IST
पुणे : बीड जिल्ह्यातील मस्साजोग इथले सरपंच संतोष देशमुख आणि परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवून देण्यासाठी तसंच या घटनांच्या निषेधार्थ आज (5 जाने.) सकल मराठा समाजाकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलाय. पुण्यातील लाल महाल येथून आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास या मोर्चाचा प्रारंभ झाला. लाल महाल, फडके हौद चौक, खडीचे मैदान चौक, 15 ऑगस्ट चौक, लडकत पेट्रोल पंप, नरपतगिरी चौकमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, नेहरू रस्ता, गणेश रस्त्यावरील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आलेत. आंदोलकांच्या माध्यमातून बीड आणि परभणी घटनेमधील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी. तसंच वाल्मिक कराड यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात करत त्यांना देखील फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.