'लाडकी बहीण योजने'च्या नावाखाली भाजपाची सदस्य नोंदणी, कुठं घडला प्रकार? पाहा व्हिडिओ - LADKI BAHIN YOJANA
🎬 Watch Now: Feature Video
Published : Jan 6, 2025, 9:32 AM IST
नांदेड : विधानसभा निवडणुकीमध्ये (Maharashtra Assembly Election 2024) महायुतीला 'लाडकी बहीण योजने'चा चांगलाचा फायदा झाल्याचं दिसून आलं. याच योजनेचा फायदा घेत भाजपानं पक्षाच्या नवीन सदस्य नोंदणीसाठी वेगळीच शक्कल लढवलीय. 2,100 रुपये मिळणार असं सांगत महिलांना सदस्य बनवल्याचा धक्कादायक प्रकार नांदेडमध्ये समोर आलाय. नांदेडमधील सांगवी भागात हा प्रकार घडलाय. दरम्यान, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन भाजपानं राज्यभरात सदस्य नोंदणी अभियान राबवण्यास सुरुवात केलीय. रविवारी या सदस्य नोंदणीचा शेवटचा दिवस असल्यानं नांदेड शहरासह जिल्ह्यात भाजपानं मोठे कॅम्प लावून सदस्य नोंदणी अभियान राबविले. मात्र, यादरम्यान 2100 रुपये मिळणार असं सांगून सदस्य नोंदणी करून घेतल्याचा आरोप नांदेडमधील सांगवी येथील स्थानिक महिलांनी केलाय.