पांडूरंगानंच दिलं, त्याच्या चरणी अर्पण करू ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं पांडूरंगापुढं केलेलं 'अनकट' भाषण - Ashadhi Wari 2024 - ASHADHI WARI 2024
🎬 Watch Now: Feature Video
Published : Jul 17, 2024, 10:52 AM IST
सोलापूर Ashadhi Wari 2024 : पंढरपूर इथं आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पांडूरंग विठूरायाची आषाढी एकादशी 2024 शासकीय महापूजा केली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या पत्नी लता शिंदे आणि मानाचे वारकरी बाळू अहिरे आणि आशाबाई अहिरे आदींसह पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री तानाजी सावंत, मंत्री गिरीश महाजन यांचा समावेश होता. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपुरात तिरुपतीच्या धर्तीवर वारकऱ्यांसाठी टोकन पद्धत सुरू करणार असल्याची घोषणा केली. यासाठी तब्बल 103 कोटी रुपयाचा निधी तत्काळ मंजूर करण्यात येईल, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं. त्यासह वारकऱ्यांसह पंढरपुरात सुसज्ज 1 हजार बेडचं रुग्णालय उभारणार असल्याचंही जाहीर केलं. "पांडूरंग हा सर्वसामान्याचा देव आहे आणि हे सरकार सर्वसामान्याचं आहे. पांडूरंगानंच दिलं, त्याच्या चरणी अर्पण करू," असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केलं. पाहा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आषाढी वारी 2024 मधील अनकट भाषण.