२२, ३०१ नाणी वापरुन बनविलं शिवलिंग, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद - MAHASHIVRATRI 2025

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 26, 2025, 2:08 PM IST

पुणे- भक्तांकडून आज राज्यभरात मोठ्या उत्साहात महाशिवरात्री साजरी केली जात आहे. अनेक मंदिरात पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळतं आहे. असं असताना महाशिवरात्री निमित्तानं पुण्यातील काळेपडळ येथील शिवभक्त दिपक घोलप यांनी ७९, ३०७ रुपये किमतीचे २२, ३०१ नाणी वापरुन शिवलिंग बनवलं आहे. नाणी वापरुन बनविलेल्या शिवलिंगाची सर्वत्र मोठी चर्चा होताना पाहायला मिळत आहे. या शिवलिंगामध्ये १० रुपयाचे २,५१० नाणी,५ रुपयाचे ४,८७५ नाणी, २ रुपयाचे १४,९१६ नाणी वापरली आहेत. या शिवलिंगची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. तर या शिवलिंगाच्या आजूबाजूला स्ट्रॉबेरी ठेवण्यात आली आहे. हे शिवलिंग पाहण्यासाठी भक्त गर्दी करताना पाहायला मिळत आहे. अशा पद्धतीचे पहिल्यांदाच शिवलिंग बनविण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. 

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.