MNS Maha Aarti : अक्षय तृतीयेला पुण्यात मनसेकडून महाआरती, सर्व हिंदुत्ववादी संघटना होणार सहभागी - अक्षय तृतीया मनसे महाआरती
🎬 Watch Now: Feature Video
पुणे - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने 3 तारखेला अक्षय तृतीयाच्या पार्श्वभूमिवर महाआरती करण्यात येणार आहे. आज पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पक्षकार्यालयात हिंदुत्ववादी संघटना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत येत्या 3 तारखेला अक्षय तृतीयाच्या दिवशी शहरभर भोंगे लावून महाआरती करण्यात येणार आहे. तसेच या महाआरतीत सर्वच हिंदुत्ववादी संघटना सहभागी होणार आहे, अशी माहिती यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांनी दिली.