Minor Boy Murder For Ransom : पिंपरी-चिंचवडमध्ये खंडणीसाठी चिमुकल्याचा खून - pune murder news
🎬 Watch Now: Feature Video
पिंपरी-चिंचवड (पुणे) - आठ वर्षीय मुलाचे अपहरण करून खून केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड गुंडा विरोधी पथकाने अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव हे बपील अहमद रईस लष्कर असे आहे. त्याने तो राहत असलेल्या इमारतीतील लक्ष्मण देवासी याचा खून केला आहे. त्याला पैशांची गरज असल्यामुळे त्यांने लक्ष्मणचे अपहरण केले ( murder for ransom in Pimpri Chinchwad Pune ) होते. मात्र अपहरण करून नेत असताना मुलगा खाली पडला व त्याला जखम झाली त्यामुळे तो ओरडू लागला व त्यामुळे त्याने त्याचा दगडाने ठेचून खून केला अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.