हैदराबाद : फिनलंडची मोबाइल कंपनी नोकियानं जस्टिन हॉटार्ड यांची सीईओ म्हणून नियुक्ती केली आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, हॉटार्ड 1 एप्रिलपासून पदभार सांभाळतील. सध्या नोकियाचे सीईओ म्हणून पेक्का लुंडमार्क काम पाहत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जस्टिन हॉटार्ड सध्या इंटेलमध्ये डेटा सेंटर आणि एआय ग्रुपचे उपाध्यक्ष आणि महाव्यवस्थापक म्हणून काम पाहत आहेत.
We are very excited to welcome Pekka Lundmark as our new CEO and President today. He is returning to lead Nokia at an important time for our industry. https://t.co/EMJGyGMBY0 Follow him on Twitter @PekkaLundmark. #TeamNokia #leadership pic.twitter.com/VoR8PN191c
— Nokia (@nokia) August 3, 2020
एआयमध्ये प्रवेशासाठी कंपनीचा संघर्ष
माहितीनुसार, 5जी उत्पादनांच्या कमी विक्रीमुळं संघर्ष करणारी कंपनी बाजारात काहीतरी वेगळं आणण्यासाठी आणि एआय सारख्या उदयोन्मुख क्षेत्रात प्रवेश करण्याचे मार्ग शोधत आहे. नोकियाचे अध्यक्ष सारी बाल्डॉफ म्हणाले, "टेक कंपन्यांमध्ये वाढ करण्याचा कंपनीचा एक मजबूत ट्रॅक रेकॉर्ड आहे. यासोबतच, नोकियाच्या भविष्यातील वाढीसाठी एआय आणि डेटा सेंटर मार्केटमध्येही चांगली पकड आहे." वृत्तसंस्था रॉयटर्सकडून मिळालेल्या माहितीनुसार, नोकियानं म्हटलं आहे की 2020 मध्ये नोकियाचे सीईओ म्हणून नियुक्त झालेले लंडमार्क वर्षाच्या अखेरीपर्यंत हॉटार्ड यांचे सल्लागार म्हणून काम पाहतील. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये नोकियानं नवीन सीईओ नियुक्तीचं खंडण केलं होतं.
फीचर फोनवर काम सुरु
सध्याच्या सीईओ पेक्का लंडमार्क यांनी कंपनी पन्हा चांगली कामगिरी करेल असा विश्वास व्यक्त केलाय. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नोकिया ही फिनलंडमधील एक बहुराष्ट्रीय दूरसंचार कंपनी आहे. नोकियानं 1991 मध्ये आपला पहिला जीएसएम फोन लाँच केला होता. त्यांचा हा फोन खूप लोकप्रिय झाला होता. यानंतर, अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम येईपर्यंत नोकिया जगातील नंबर वन मोबाइल कंपनी होती. 2013 मध्ये, टेक जायंट मायक्रोसॉफ्टनं नोकिया विकत घेतली होती. 2016 पर्यंत, मायक्रोसॉफ्टनं नोकियाचा विंडोज-आधारित लुमिया स्मार्टफोन सादर केला होता. 2017 मध्ये, नोकियाचा व्यवसाय एचएमडी ग्लोबलनं विकत घेतला. सध्या, एचएमडी ग्लोबल नोकियाच्या नावाखाली स्मार्टफोन आणि फीचर फोनवर काम करत आहे.
हे वाचलंत का :