Mumbai Khairne MIDC Fire : खैरने एमआयडीसीतील केमिकल कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या ५ गाड्या घटनास्थळी दाखल - मुंबई खैरने एमआयडीसी केमिकल कंपनी आग
🎬 Watch Now: Feature Video
नवी मुंबई - नवी मुंबईतील खैरने एमआयडीसीतील ( Mumbai Khairne MIDC Fire ) एका केमिकल कंपनीला आज 4 वाजता आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. व्हाईट हाऊसच्या पाठीमागे असलेल्या एका कंपनीला भयंकर मोठी आग लागली असून अग्निशमन दलाच्या ५ गाड्या शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. गेले पाऊण तासापासून अग्निशमन दलाचे जवान प्रयत्न करीत आहेत, परंतु आग आटोक्यात आणण्यास अवघड जात असल्याचे तेथील स्थानिक लोकांचे म्हणणे आहे. ही आग झपाट्याने वाढत असून शेजारील कंपनीस सुद्धा धोका निर्माण झाला आहे. फायर ब्रिगेड अर्धातास उशीर आल्याचे स्थानिकांनी सांगितले असून, परिसरातील धुराचे लोळ पसरले आहेत. ही आग आजूबाजूच्या कंपन्यामध्ये पसरल्याने तेथील कर्मचाऱ्यांना सुद्धा बाहेर काढण्यात आले आहे.