प्राप्तिकर रचनेत बदल केल्याने सर्वसामान्य करदात्याला मोठा फायदा - Vidarbha Industries Association nagpur
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-5929772-thumbnail-3x2-via.jpg)
नागपूर - अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नवीन कररचना प्रस्तावित केल्याने कोट्यवधी कारदात्यांना दिलासा मिळाल्याची प्रतिक्रिया नागपुरातील नागरिकांनी दिली आहे. अर्थमंत्र्यांनी घेतलेला निर्णय योग्य आहे, जुन्या कररचनेत अनेक त्रुटी होत्या, त्यात ५ तारखेपासून तर थेट ३० टक्के कर भरावा लागायचा. मात्र, आता त्यामध्ये अनेक टप्पे तयार केल्याने याचा फायदा करदात्यांना होणार आहे. करात सूट देताना अर्थमंत्र्यांनी इतर सूट मिळणार नसल्याचे स्पष्ट केल्यामुळे सामाजिक सुरक्षा धोक्यात येईल, असे देखील मत काहींनी व्यक्त केले आहे. एकंदरीतच यावेळेसचा अर्थसंकल्प हा शेती, शेतकऱ्यांसाठी आणि सामान्य नागरिकांना दिलासा देणारा आहे. सोबतच उद्योग जगतातूनही यावर संमिश्र प्रतिक्रिया येत असल्याने प्राथमिक दृष्टीने हे बजेट लोकप्रिय असल्याचे वाटत आहे.