उद्यापासून कोल्हापूरचे अंबाबाई मंदिर दर्शनासाठी खुले; पाहा काय आहे नियमावली
🎬 Watch Now: Feature Video
कोल्हापूर - उद्यापासून (सोमवार) करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले होत आहे. याच पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने नियमावली बनवली असून विविध अटी-शर्ती भाविकांना घातल्या आहेत. मंदिर जरी दर्शनासाठी उघडणार असले तरी कोरोनाचे संकट मात्र अद्यापही संपूर्ण देशावर आहे आणि त्यामुळेच भक्तांनी सुद्धा या नियमांचे पालन करण्याची गरज असल्याचे देवस्थान समितीने म्हटले आहे. नेमक्या काय नियमावली आहेत आणि कशा पद्धतीने भाविकांना अंबाबाईचे दर्शन मिळणार आहे. याबाबत देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्याशी आमच्या प्रतिनिधीने चर्चा केली.